मुंबई : भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक (Sania Mirza Shoaib Malik News) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांचात आता पूर्वीसारखं काहीही आलबेल राहिलेलं नाही, अशा बातम्या समोर आल्या. काहींनी तर शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांचा घटस्फोट होणार आहे, असंही म्हटलं. पण अजूनतरी शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांनी अधिकृत याबाबत काहीच भाष्य केलेलं नाही. त्यामुळे कुजबूज आणखी वाढली. अशातच आता सोशल मीडियावर (Social Media) शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांच्या संसारात नेमकं कोणत्या गोष्टीमुळे विघ्न आलं? त्यांच्या संसारात कुणी विष कालवलं? यावरुन तर्क वितर्क लढवले जात आहे. काही सोशल मीडिया युजर्सनी, शोएब-सानियाच्या नात्याआड एक पाकिस्तानी अभिनेत्री (Pakistani Actress) असल्याची चर्चा रंगली आहे.
नोव्हेंबर 2021 साली पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने एक फोटोशूट केलं होतं. एका मॅगझिनसाठी हे फोटोशूट करण्यात आलं. या फोटोशूटमध्ये शोएब मलिकसोबत एक पाकिस्तानी अभिनेत्री होती. या अभिनेत्री नाव आयशा उमर असं आहे.
शोएब मलिक आणि आयशा उमर या दोघांच्या बोल्ड अंदाजातील फोटोंनी सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. हा फोटो आता घटस्फोटांच्या चर्चेत लोकांना संभ्रमात पाडतोय.
आयशा उमर या पाकिस्तानी अभिनेत्रीमुळे शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांचा घटस्फोट असल्याचं काहींना वाटतंय. पण अद्याप या गोष्टीला कोणताही दुजोरा मिळू शकलेला नाही. पण शोएब मलिकने ज्या आयशा उमरसोबत बोल्ड फोटोशूट केलं, ती नेमकी आहे कोण, याची चर्चा झाली नसती तरच नवल!
12 ऑक्टोबर 1981 रोजी पाकिस्तानच्या लाहोरमध्ये आयशाचा जन्म झाला. ती पाकिस्तानातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने पाकिस्तानासाठी गाजलेल्या जिंदगी गुलजार है, या मालिकेत काम केलं होतं.
आयशाला एक भाऊ देखील आहे. आयशा लहान असतानाच तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. तेव्हा तिच्या आईने लहान भावाचा आणि आयशाचा सांभाळ केला. आयशाने नॅशनल स्कूल ऑफ बॅचलर्स आणि मास्टर्सची पदवी घेतली आहे. ती शाळा-कॉलेजपासून नाटकात काम करु लागली होती.
सुरुवातील आयशाने मॉडेलिंगपासून आपल्या करिअरची सुरुवात केली. तिने असंख्य जाहिरातीत काम केलंय. लैंगिक शोषणाचाही आयशाला सामना करावा लागला होता. हीच गोष्ट 2020 साली तिने एका पाकिस्तानी कार्यक्रमातच सांगितली होती.
फक्त पाकिस्तानी मालिकाच नाही, तर पाकिस्तानी सिनेमांमध्येही तिने काम केलंय. लव मे हम आणि मैं हू शाहिद अफरीदी या सिनेमातील आयटम नंबरही परफॉर्म केला आहे. हे दोन्ही सिनेमा हिटही झाले होते. शिवाय 2018 साली न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये आयशाने पाकिस्तानच प्रतिनिधित्व केलं होतं.