मुंबई : विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy 2022) स्पर्धेत युवा आणि सिनिअर खेळाडूंनी आत्तापर्यंत चांगली खेळी केली आहे. तसेच पहिल्या सामन्यापासून रोमांचक मॅच चाहत्यांना पाहायला मिळाल्या आहेत. सध्या एक अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली. या स्पर्धेत खेळणाऱ्या मुंबईच्या (Mumbai) एका खेळाडूला अचानक हॉस्पीटलमध्ये (Hospital) दाखल करण्यात आलं आहे. आतापर्यंत त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये चांगली खेळी केली आहे.
सरफराज खान हा विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळत आहे. त्यांच्या पोटात दुखायला लागल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सरफराजला अचानक त्रास होऊ लागल्याने त्यांच्यासोबत असणारे सगळे सहकारी घाबरले होते. काल झालेल्या सर्विसेज विरुद्धच्या सामन्यात सरफराज खान दिसला नाही. सध्या विजय हजारे ट्रॉफी रांचीत सुरु आहे.
सरफराज खानला मागच्या अनेक दिवसांपासून मुतखड्याचा त्रास आहे. त्यामुळे त्यांच्या पोटात अधिक दुखते. मुतखडा अधिक लहान आहे. परंतु त्याचा सरफराजला अधिक त्रास होतो, असं त्याचे नौशाद खान यांनी क्रिकबझ या वेबसाइटला सांगितले आहे. आता सरफराज खान बरा असून त्याला आज रुग्णालयातून सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. पुढच्या मॅचमध्ये सरफराज खान खेळण्याची शक्यता आहे.
सरफराज खानने रणजी ट्रॉफीमध्ये सगळ्यात जास्त धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे 6 मॅचमध्ये त्याने 982 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे सरफराज खानने 4 शतक आणि 2 अर्धशतक सुद्धा लगावले आहेत.