मुंबई – इंडियन प्रीमियर लीग IPL 2022 सीजनमध्ये गुजरात टायटन्स (GT) ने शुक्रवारी विजयाची हॅट्ट्रिक केली. एका रोमांचक सामन्यात गुजरात संघाने पंजाब किंग्जचा (PBKS) 6 गडी राखून पराभव केला. सलामीवीर शुभमन गिलची अर्धशतकी खेळी आणि राहुल तेवतियाच्या षटकारांमुळे गुजरात संघाने हा सामना जिंकला आहे. गुजरात संघाने काल 4 गडी गमावून 190 धावा करत हा रोमहर्षक सामना जिंकला. गुजरात संघाकडून खेळताना शुभमन गिलने 59 चेंडूत 96 धावांची शानदार खेळी केली. त्याचे शतक नक्कीच हुकले, पण चाहत्यांची त्याने मने जिंकली. सोशल मीडियावर चाहता म्हणाला की, टीमचं भविष्य तुझ्या हातात आहे.
Bairstow is sledging him from behind the stumps and Shubman Gill is giving it back to him after every shot ?#IPL2022 pic.twitter.com/iogLAt3aTm
— India Fantasy (@india_fantasy) April 8, 2022
शुभमनने आपल्या खेळीत 11 चौकार आणि 1 षटकार लगावला. त्याचा स्ट्राइक रेट 162.71 होता. शुबमनला मॅच जिंकण्याच्या खेळण्याचे बक्षीसही मिळाले आहे. त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. गुजरात संघाला शेवटच्या षटकात 19 धावांची गरज असतानाही राहुल तेवतियाने शेवटच्या दोन चेंडूत दोन षटकार खेचून गुजरातला विजय मिळवून दिला. अशा स्थितीत तेवतिया विजयाचा खरा हिरो ठरला.
Shubhman Gill is among the most talented youngsters in the World. Indian team future is in safe hands. #IPL2022 #PBKSvGT pic.twitter.com/QjB3LfSkia
— DK (@CricCrazyDK) April 8, 2022
शुभमनची ही खेळी पाहून सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याचे जोरदार कौतुक केले. एका यूजरने लिहिले – शुभमन गिल एक चांगला खेळाडू आहे. टीम इंडियाचे भविष्य पूर्णपणे त्याच्या हातात सुरक्षित हातात आहे. आणखी एका युजरने सांगितले की, मागील 10 आयपीएल इनिंगमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत शुभमन दुसऱ्या क्रमांकावर आहे. जोस बटलर (459) नंतर त्याने 456 धावा केल्या आहेत.