मुंबई : काही वेळापूर्वीच क्रिकटविश्वातून एक मोठी बातमी समोर आली. सौरव गांगुली (Saurav Ganguly) यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा (BCCI President) राजीनामा दिल्याच्या बातम्या समोर आल्या. मात्र आता जय शाह यांच्या दाव्याने काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. कारण सौरव गांगुली यांनी अजूनही बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नाही, असे जय शाह (Jay Shah) म्हणाले आहेत. जय शाह हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे चिरंजीव तसेच बीसीसीआयचे सचिव आहेत. सौरव गांगुली यांनी फक्त राजीनामा दिल्याच्याच बातम्या समोर आल्या नाहीत तर सौरव गांगुली हे राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून राज्यसभेवर निवडले जाऊ शकतात, अशीही शक्यता वर्तवण्यात आली होती. तसेच त्यांच्या भाजपात प्रवेश करण्याच्या चर्चांनीही चांगलाच जोर धरला होता. मात्र या सर्व प्रकरणांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
Sourav Ganguly has not resigned as the president of BCCI: Jay Shah, BCCI Secretary to ANI pic.twitter.com/C2O3r550aL
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) June 1, 2022
काही वेळापूर्वीच गांगुली यांनी ट्विट करत नव्या इनिंगबाबत सूचक विधान केले आहे. याच ट्विटमुळे गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गांगुली 2019 मध्ये BCCI चे 39 वे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. BCCI मध्ये पदभार स्वीकारण्यापूर्वी, दिग्गज क्रिकेटर क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे अध्यक्ष होते.
— Sourav Ganguly (@SGanguly99) June 1, 2022
1992 ला माझा क्रिकेटचा प्रवास सुरु झाला आणि 2022 हे त्या प्रवासाचं तिसावं वर्ष आहे. तेव्हापासून क्रिकेटनं मला भरपूर काही दिलंय. त्यातलं सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही दिलेला सपोर्ट. मी त्या प्रत्येक व्यक्तीचे आभार व्यक्त करु इच्छितो जो ह्या प्रवासाचा भाग झाला, पाठिंबा दिला आणि मदत केली. त्या बळावरच आज मी तिथं पोहोचलोय जिथं आहे. आज मी नवी काही योजना बनवतोय जी मला वाटतं की अनेक लोकांना फायदेशीर ठरेल. मला आशा आहे की, माझ्या आयुष्याच्या ह्या नव्या चॅप्टरमध्येही तुम्ही मला सपोर्ट कराल, अशी पोस्ट गांगुली यांच्याकडून काही वेळापूर्वीच करण्यात आली आहे. त्यामुळे अजूनतरी या प्रकरणाबाबत स्पष्टता आलेली नाही. तसेच गांगुली यांनीही अशा बातम्यानंतर काही स्पष्टीकरण दिलं नाही. त्यामुळे त्यांच्याकडूनही याबाबत स्पष्टता येण्याची शक्यता आहे.