भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीच्या मुलीचा अपघात झाल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. कोलकाता येथे एका ट्रकने तिच्या कारला धडक दिली होती. पण सुदैवाने कोणीही जखमी झालं नव्हतं.
या घटनेनंतर अनेकांनी सौरव गांगुलीच्या लेकीचे नाव सर्च केलं होतं. पण बऱ्याच जणांना माहित नाही की त्याची लेक नेमकं काय करते ते. चला जाणून घेऊयात सौरव गांगुलीची लाडकी लेक सना गांगुलीबद्दल .
सौरव गांगुलीची लाडकी लेक सनाबद्दल…
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली अनेकांचाच आवडता खेळाडू. किंबहुना आवडता कर्णधार. याच कर्णधाराची लाडकी लेक आता चर्चेचा विषय ठरतेय. शक्यतो वडील ज्या क्षेत्रात असतात त्याच क्षेत्राचं आकर्षण मुलांनासुद्ध असतं.
पण सौरव गांगुलीच्या लेकीच्याबाबतीत मात्र तसं झालं नाही. सना गांगुलीनं क्रिकेट क्षेत्रात नाही तर एका वेगळ्याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. तिने तिच्या करिअरसाठी एक वेगळीच वाट निवडली आहे.
बारावीमध्ये 98 टक्के ते मोठ्या कंपन्यांमध्येही इंटर्नशिप
सनाचा जन्म 2001 मध्ये झाला. तिचे वडील अर्थात सौरव गांगुली हे भारतीय क्रिकेटमधील एक सुप्रसिद्ध नाव. तर, आई, डोना गांगुली एक ओडिसी नृत्यांगना आहे.
सनानं कोलकाता येथील लोरेटो हाऊस इथून शालेय शिक्षण पूर्ण केलं असून, ही देशातील प्रतिष्ठीत शाळांपैकी एक आहे. इयत्ता बारावीमध्ये सनानं 98 टक्के मार्क मिळवले होते.
22-23 वर्षांची सना लाखोंचं पॅकेज घेतेय
उच्च शिक्षणासाठी ती लंडनला गेली होती. तिने तिथे यूनिवर्सिटी कॉलेजमधून अर्थशास्त्रामध्ये बी.एस.सी.ची पदवी घेतली. त्यानंतर त्यानंतर तिने एचएसबीसी, केपीएमजी, गोल्डमॅन सॅक्स, बार्कलेज, आयसीआयसीआय, PwC आणि डेलॉयट सारख्या मोठ्या कंपन्यांमध्येही इंटर्नशिप केली आहे. त्यानंतर ती आता एका MNC मध्ये काम करत असून 22-23 वर्षांची सना लाखोंचं पॅकेज घेत आहे.
PwC मध्ये इंटर्नशिप अन् 30 लाखांचे पॅकेज
सध्या ती एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत काम करते. पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर सना गांगुलीने PwC या MNC कंपनीत इंटर्नशिप सुरू केली होती. रिपोर्ट्सनुसार, PwC आपल्या स्किल्ड वर्कफोर्सला जवळपास 30 लाख रुपये वार्षिक इंटर्नशिप पॅकेज देते.
PwC मध्ये इंटर्नशिपनंतर ग्लासडोर आणि इतर रिक्रूटमेंट वेबसाइट्सनुसार, डेलॉयट कंपनीतही इंटर्नशिप केली. या कंपनीमधील पॅकेज डिपार्टमेंटच्या हिशोबाने 5 ते 12 लाख रुपये वार्षिक असल्याची माहिती आहे.
लिंक्डइन प्रोफाइलनुसार सना सध्या INNOVERV मध्ये सल्लागार
दरम्यान लिंक्डइन प्रोफाइलनुसार सना सध्या INNOVERV मध्ये सल्लागार म्हणून काम पाहतेय. तिनं शैक्षणिक कारकिर्द आणखी उंचावण्यासाठी म्हणून ऑक्सफोर्ड विश्वविद्यालयातून एक समर स्कूल कार्यक्रमही पूर्ण केला. सना सध्या तिच्या कामासोबतच CFA साठीचं प्रमाणपत्र शिक्षणही घेच असून, मॉर्गन स्टेनलीमध्येही तिनं मॅनेजमेंट अॅनालिस्ट म्हणून काम केलं आहे.
सना प्रशिक्षित नृत्यांगना
शिक्षणाव्यतिरिक्त सना आईप्रमाणंच एक प्रशिक्षित नृत्यांगना असून, तिनंही अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. वेळ मिळेल तेव्हा आणि वेळ मिळेल तसं तीसुद्धा या कलेचं सादरीकरण करत असते. सनाने तिच्या मेहनतीवर तिचं करिअर उंचावर नेऊन ठेवलं आहे. त्यामुळे नक्कीच सगळ्यांनाच तिचं कौतुक आहे.