Video | इम्रान ताहिरचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ‘खेळभावना असावी तर अशी…!’

| Updated on: Mar 04, 2021 | 3:42 PM

दक्षिण आफ्रिकेच्या ताहिरने पाकिस्तानी दिवंगत खेळाडूला आपल्या कृतीने आदरांजली वाहिली. | South Africa imran tahir

Video | इम्रान ताहिरचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल, खेळभावना असावी तर अशी...!
Imran Tahir PSL 2021
Follow us on

मुंबई :  पाकिस्तान सुपर लीगच्या (PSL 2021) 14 व्या सामन्यात मुल्तान सुल्तानकडून खेळणार्‍या दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रान ताहिरने ( South Africa Imran Tahir) क्वेटा ग्लेडिएटर्सविरूद्धच्या सामन्यादरम्यान एक अशी कृती केली ज्या कृतीची संपूर्ण क्रिकेट विश्वात चर्चा होतीय. पाकिस्तानमधल्या क्रिकेट स्पर्धेत खेळताना दक्षिण आफ्रिकेच्या ताहिरने पाकिस्तानी दिवंगत खेळाडूला आपल्या कृतीने आदरांजली वाहिली. त्यामुळे त्याच्या खेळभावनेचं कौतुक होत आहे. (South Africa imran tahir tribute late Pakistani Cricketer Tahir Mughal PSL 2021)

इमरान ताहिरचा हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर चाहते खूपच भावूक झाले आहेत. खरं तर, ताहिरने ग्लेडिएटर्स संघाचा फलंदाज सॅम अयूबला बाद करताच त्याचा आनंद साजरा करण्यासाठी आपल्या अंगावरील टी-शर्ट काढला. जेव्हा इम्रानने आपला टीशर्ट उतरविला त्यावर पाकिस्तानचा माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू ताहिर मुगलचा फोटो होता. याच कृतीने त्याने क्रिकेट रसिकांची मने जिंकली.

पाहा तो हृदयस्पर्शी व्हिडीओ

इम्रानने विकेट घेतल्यानंतर माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक ताहिर मुगल यांना श्रद्धांजली दिली. ताहिरने जेव्हा सोशल मीडियावर हे केले तेव्हा सर्वांच्या डोळ्यात पाणी आले.

क्वेटा ग्लेडीएटर्स विरुद्धच्या सामन्यात इम्रान ताहिरने 4 षटकांत 29 धावा देऊन 2 बळी घेतले. प्रथम फलंदाजी करताना क्वेटाच्या संघाने 20 षटकांत 7 गडी गमावून 176 धावा केल्या. त्यामध्ये उस्मान खानने 81 धावा केल्या. उस्मान खानने केवळ 50 चेंडूत 81 धावा करून संघाची धावसंख्या 176 धावांवर नेण्यात विशेष भूमिका बजावली. शहनावाज धानीने मुलतानकडून सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.

कोण होता ताहिर मुगल?

पाकिस्तानचा माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू ताहिर मुगल यांचे कर्करोगाने निधन झाले. ताहिर मुगलने पाकिस्तानकडून 112 प्रथम श्रेणी सामने खेळले. यात त्याने 3 हजार 202 धावा केल्या. क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर ताहिर मुगलने बराच काळ प्रशिक्षक म्हणून काम केले. परंतु वयाच्या 43 व्या वर्षी कर्करोगाच्या आजारामुळे त्यांचे निधन झाले. यावर्षी 10 जानेवारीला ताहिर मुगल यांचे निधन झाले.

हे ही वाचा :

IPL 2021 | CSK आयपीएलच्या आगामी मोसमासाठी सज्ज, ट्रेनिंग कॅंपसाठी धोनीसह युवा खेळाडू चेन्नईत

Video | कायरन पोलार्डचा तडाखा, 6 चेंडूत 6 सिक्स, युवराजच्या विक्रमाशी बरोबरी