केपटाऊन : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (Cricket) स्थान मिळवणं सोपं नाही. संघात स्थान मिळवल्यानंतर ते टिकवणं खायचं काम नाही. त्यासह कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडणं म्हणजे येड्या गबाळ्याचं काम नाही. पण या भूमिका दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथने (graeme smith) सार्थपणे पार पाडल्या. स्मिथने आपल्या नेतृत्वात आफ्रिकेला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं. एक फलंदाज आणि कर्णधार अशी दुहेरी भूमिका त्यानी वठवली. एका कर्णधाराकडून टीम मॅनेजमेंटला अपेक्षित असलेली कामगिरी स्मिथने करुन दाखवली. स्मिथला क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन अनेक वर्ष झाले आहेत. तो आता आफ्रिका क्रिकेट बोर्डाचा संचालकआहे. पण स्मिथची क्रिकेट कारकिर्द कशी होती, हे आपण जाणून घेणार आहोत. (south africa successful former captain Graeme Smith)
साधारण 20 ते 23 हे वय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याचं असतं. मात्र वयाच्या अवघ्या 22 वर्षी स्मिथची इतर खेळाडूंना वगळून कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. तेव्हा संघात हर्षल गिब्स, जॅक कॅलीस, मार्क बाऊचरसारखे अनुभवी खेळाडू होते. मॅनेजमेंटचा हा निर्णय खेळाडूंना पटला नव्हता. मात्र हा निर्णय संघ व्यवस्थापनाला रुचला होता. यामुळे स्मिथ कर्णधारपदी नियुक्त करण्यात आलेला आफ्रिकेचा सर्वात युवा कर्णधार ठरला.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यांमध्ये नेतृत्व करण्याचा विक्रम ग्रॅमी स्मिथच्या नावे आहे. स्मिथने एकूण 109 सामन्यांमध्ये (108 साउथ अफ्रीका, 1 ICC इलेवहन) नेतृत्व केलं आहे. यामध्ये त्याने आफ्रिकेला 53 सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. तसेच कर्णधार म्हणून सर्वाधिक धावांचा विक्रमही स्मिथच्या नावावर आहे. स्मिथने कर्णधार म्हणून 8 हजार 659 धावा केल्या आहेत.
स्मिथच्या कॅपटन्सीमध्ये कसोटीसह वनडेमध्येही अनेक रेकॉर्ड्स ब्रेक केले. तसेच अनेक पराक्रमही केले. वनडेमध्ये ऐतिहासिक रन्स चेज करण्याचा विक्रमही आफ्रिकेच्या नावावर आहे. घटना आहे 2006 मधील. आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात जोहान्सबर्ग येथे सामना खेळण्यात येत होता. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 400 पेक्षा अधिक धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 400 प्लस धावा करण्याची ही पहिलीच वेळ होती. ऑस्ट्रेलियाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 4 विकेट्स 434 धावा केल्या. यामुळे आफ्रिकेला 435 धावांचं अशक्यप्राय वाटणारं आव्हान मिळालं.
इतकं तगडे आव्हान मिळाल्याने आफ्रिकेचा पराभव निश्चित मानला जात होता. पण स्मिथने 55 चेंडूत 90 धावांची शानदार खेळी करत विजयाचा पाया रचला. यानंतर आफ्रिकेच्या हर्षल गिब्स, मार्क बाऊचरसारख्या खेळाडूंनी धमाकेदार खेळी करत 1 चेंडू राखून ऐतिहासिक विजय मिळवला.
स्मिथने केवळ आफ्रिकेतच नाही तर परदेशातही हिट कामगिरी केली. त्याने आपल्या कॅपटन्सीमध्ये कसोटीमध्ये आफ्रिकेला नंबर 1 टीम बनवून दाखवलं. आफ्रिकेचा 2006 ते 2015-16 दरम्यान एकदाही परदेशात कसोटी मालिकेत पराभव झाला नाही. स्मिथकडे 2014 पर्यंत कर्णधारपदाची धुरा होती.
स्मिथने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 345 सामन्यांमध्ये 37 शतक आणि 90 अर्धशतकांसह 17 हजारपेक्षा अधिक धावा केल्या. स्मिथने यातील 9 हजारांपेक्षा अधिक धावा आणि 27 शतकं ही कसोटी क्रिकेटमध्ये लगावल्या. तसेच त्याने आपल्या संपू्र्ण क्रिकेट कारकिर्दीत 52 शतकांसह 24 हजारांपेक्षा अधिक धावा केल्या. दरम्यान क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर स्मिथ ग्रॅम स्मिथची 2019 मध्ये आफ्रिकेच्या क्रिकेट संचालकपदी निवड करण्यात आली. तेव्हापासून तो ही जबाबदारी सार्थपणे पार पाडत आहे.
संबंधित बातम्या :
Graeme Smith | बालहट्टापुढे माजी कर्णधार स्मिथची माघार, बाप लेकाचा भन्नाट व्हिडीओ पाहिलात का?
(south africa successful former captain Graeme Smith)