केपटाऊन : दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड (South Africa vs England) यांच्यात आज (4 डिसेंबर) होणारा पहिला एकदिवसीय सामना रद्द करण्यात आला आहे. कोरोना विषाणूमुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या एका खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हा सामना टॉसच्या 1 तासाआधी रद्द करण्यात आला. सामना रद्द केल्याने हा सामना 6 डिसेंबरला खेळण्यात येणार आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाच्या तसेच आयसीसीच्या ट्विटरवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. south africa vs england first odi match has been postponed due to African players tested positive for covid 19
The first #SAvENG ODI has been postponed after a South Africa player tested positive for COVID-19. pic.twitter.com/O7RNpUWGg3
— ICC (@ICC) December 4, 2020
कोरोना झालेल्या खेळाडूचं नाव गुप्त ठेवण्यात आलं आहे. या खेळाडूने कोरोना नियमांचं उल्लंघन केलं होतं. या नियमांच्या उल्लंघनामुळे या खेळाडूला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे टॉसच्या तासाभराआधी सामना रद्द केला गेला. दरम्यान आता हा सामना रविवारी 6 डिसेंबरला पर्ल येथे खेळण्यात येणार आहे.
CONFIRMED: Cricket South Africa and @ECB_cricket confirm the postponement of the first #BetwayODI of the three-match series to Sunday, 06 December 2020. #SAvENG pic.twitter.com/wRXpr7YYA9
— Cricket South Africa (@OfficialCSA) December 4, 2020
“कोरोना संक्रमित खेळाडू कोणत्याही खेळाडूच्या संपर्कात आलेला नाही.त्यामुळे पुढील सामना निश्चित 6 डिसेंबरला खेळला जाईल. दरम्यान यानंतरही आणखी कोणत्या खेळाडूला कोरोनाची लागण झाली, तर परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल”, अशी माहिती दक्षिण आफ्रिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली.
इंग्लड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात एकूण 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यात येणार आहे. यातील सुधारित वेळापत्रकानुसार पहिला एकदिवसीय सामना 6 डिसेंबरला खेळण्यात येणार आहे. यानंतर दुसरा आणि तिसरा एकदिवसीय सामना अनुक्रमे 7 आणि 9 डिसेंबरला खेळण्यात येणार आहे. दरम्यान याआधीच्या 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेत इंग्लंडने आफ्रिकेवर 3-0 अशा एकतर्फी फरकाने विजय मिळवलाय.
डिसेंबर 6 , पहिला सामना, पर्ल, दुपारी 1. 30 वाजता
डिसेंबर 7 , दुसरा सामना, केपटाऊन, दुपारी 4. 30 वाजता
डिसेंबर 9 , तिसरा सामना, केपटाऊन, दुपारी 4. 30 वाजता
दरम्यान न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान क्रिकेट टीममधील एकूण 10 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पाकिस्तानचा संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडमध्ये पोहचल्यानंतर काही खेळाडूंचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यामधील काही खेळाडूंना आधीपासूनच कोरोनाची लक्षणं असल्याची माहितीही न्यूझीलंडच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली होती. पाकिस्तान या दौऱ्यात न्यूझीलंडविरोधात 3 टी 20 आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 20 डिसेंबरपासून होणार आहे.
संबंधित बातम्या :
Ajit Agarkar | विकेट्स आणि धावांचं वेगवान ‘अर्धशतक’, लॉर्डसवर सेंच्युरी, हॅप्पी बर्थडे आगरकर
south africa vs england first odi match has been postponed due to African players tested positive for covid 19