मुंबई : दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान (South Africa vs Pakistan) यांच्यातील रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विकेट कीपर फलंदाज क्विंटन डिकॉकने (quinton de kock) रडका खेळ केला. त्याने पाकिस्तानी फलंदाज फकर झमानला (Fakhar Zaman) गाफिल ठेवण्यासाठी फिल्डर्सकडे भलता इशारा केला. त्यामुळे झमानला तंबूत जावं लागलं. डिकॉकच्या चिडक्या खेळीवर सगळीकडून टीका होत असताना आता आयसीसीने (ICC) देखील डिकॉकला इंगा दाखवलाय. (South Africa vs pakistan ICC Action against quinton de kock Over Fakhar Zaman Runs Out miss Double century)
डिकॉकच्या फेक फिल्डिंगमुळे त्याला तसंच दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराला आयसीसीने दंड ठोठावला आहे. डिकॉकच्या मॅच फीसच्या 75 टक्के रक्कम कापण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे. तर दक्षिण आफ्रिकन कर्णधार टेंबा बवुमा यांच्या मॅचमधून 20 टक्के रक्कम कापण्याचा आयसीसीने निर्णय घेतला आहे.
क्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान (South Africa vs Pakistan) यांच्यातील रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला 17 धावांनी नमवलं. परंतु या सामन्यात पाकिस्तानी फलंदाज फकर झमानने (Fakhar Zaman) ज्या प्रकारे बॅटिंग केली, त्याने क्रिकेट वेड्या प्रेक्षकांच्या डोळ्याचं अक्षरश: पारणं फिटलं. त्याने 155 चेंडूत 193 धावा फटकावल्या. या खेळीत त्याने 18 चौकार आणि 10 षटकार लगावले. त्यांचं द्विशतक केवळ 7 धावांनी हुकलं आणि त्याला कारणीभूत ठरला दक्षिण आफ्रिकेचा चलाख, चतुर विकेट कीपर क्विंटन डिकॉकचा (Quinton de kock) तो एक इशारा…!
मैदानात फकर झमानचं वादळ आलं होतं. आफ्रिकन बोलर्सने त्याला आऊट करण्यासाठी जंग जंग पछाडलं. पण काही केल्या तो आऊट होत नव्हता. फकरने आफ्रिकन बोलर्सची डाळ शिजू दिली नाही. संधी मिळेल तेव्हा तो आक्रमण करत राहिला. 190 धावा क्रॉस केल्यानंतर त्याने सावध पवित्रा घेतला. 50 व्या ओव्हर्सच्या पहिल्या चेंडूवर त्याने जोरदार फटका मारला. एक धाव पूर्ण केल्यानंतर तो दुसऱ्या धावेसाठी पळाला. जेव्हा तो दुसऱ्या धावेसाठी धावत होता तेव्हा चतुर डिकॉकने फकरला गाफिल ठेवण्यासाठी फिल्डर्सला नॉन स्टायकर एंडला बॉल फेकण्यासाठी सांगितलं.
डिकॉकचा प्लॅन फत्ते झाला. डिकॉकच्या इशाऱ्याकडे फकरने पाहिलं आणि त्यालाही वाटलं आता फिल्डर नॉन स्टायकर एंडला बॉल फेकणार… पण फिल्डरने डिकॉकच्या दिशेने बॉल फेकला आणि त्या बॉलने बरोबर स्टम्पचा वेध घेतला…. फकरची 193 धावांची झुंजार इनिंग संपुष्टात आली…! डिकॉकची फेक फिल्डिंग कामाला आली. फकर झमानच्या झुंजार खेळीबद्दल त्याला ‘मॅच ऑफ द मॅच’च्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.
De Kock ?? Pro Version Of Sanga.
Well Played Fakhar Zaman. pic.twitter.com/CwPOIpalRI
— Ravi Mishra (@G33kBoyRavi) April 4, 2021
(South Africa vs pakistan ICC Action against quinton de kock Over Fakhar Zaman Runs Out miss Double century)
हे ही वाचा :