मुंबई : टीम इंडिया (Team India) विरुद्धच्या एकदिवसीय आणि टी 20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa Womens Team Tour India) संघाची घोषणा करण्यात आली आहे. आयसीसीने (ICC) ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. या दौऱ्यात आफ्रिका टीम इंडिया विरुद्ध 5 वनडे आणि 3 टी सामन्यांची मालिका खेळणार आहे. 7 मार्चपासून एकदिवसीय मालिकेची सुरुवात होणार आहे. नियमित कर्णधार वान निएर्केक दुखापतग्रस्त असल्याने या मालिकेला मुकणार आहे. यामुळे नेतृत्वाची जबाबदरी लुने लूसकडे असणार आहे. तर वानसोबतच अलावा मसाबाताही दुखापतीमुळे माघार घेतली आहे. या दौऱ्यासाठी आफ्रिकेचा संघ शनिवारी भारतात दाखल झाला आहे. आफ्रिका एकूण 6 दिवस क्वारंटाईन राहणार आहे. (south africa Womens squad for odi and t20i series against India announced)
? Injured Tryon, van Niekerk miss out
? Klaas sidelined after "eleventh-hour injury"South Africa have named a 17-member squad for the limited-overs series against India. #INDvSA pic.twitter.com/A0yvu9WkTc
— ICC (@ICC) February 28, 2021
दरम्यान काल म्हणजेच 27 फेब्रुवारीला बीसीसीआयने आफ्रिके विरुद्धच्या या एकदिवसीय आणि टी 20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली होती. वनडे सीरिजमध्ये मिताली राज नेतृत्व करणार आहे. तर हरमनप्रीत कौरकडे टी 20 संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी असणार आहे.
NEWS: India Women’s squad for ODI and T20I series against South Africa announced. @Paytm #INDWvSAW #TeamIndia
Details ? https://t.co/QMmm96qcOt pic.twitter.com/tKjvevd6qH
— BCCI Women (@BCCIWomen) February 27, 2021
मिताली राज (कॅप्टन), हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, पूनम राऊत, प्रिया पुनिया, यास्तिका भाटिया, दयालन हेमलता, दीप्ती शर्मा, सुष्मा वर्मा (विकेटकीपर), श्वेता वर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, झुलन गोस्वामी, मानसी जोशी, पूनम यादव, सी. प्रत्युषा आणि मोनिका पटेल.
हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, रिचा घोष, हरलीन देओल, सुष्मा वर्मा, नुझत परवीन, आयुषी सोनी, अरुंधती रेड्डी, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, मानसी जोशी, सी. प्रत्युषा, मोनिका पटेल आणि दिल बहादूर.
सुने लूस (कर्णधार), अयाबोंगा खाका, शबनम इस्माइल, लाउरा वोलवार्डट, त्रिशा चेट्टी, सिनालो जाफता, तस्मीन ब्रिट्ज, मरिजाने काप, नोंदूमिसो शंगासे, लिजेले ली, अनेके बोश, फाये तुनिक्लीफ, नोनकुलुलेको मलाबा, मिगनोन डू प्रीज, नादिने डी क्र्लेक, लारा गुडआल आणि तुमी सेखुखुने.
पहिला सामना, 7 मार्च , सकाळी 9 वाजून 30 मिनिट
दुसरा सामना, 9 मार्च, सकाळी 9 वाजून 30 मिनिट
तिसरा सामना, 12 मार्च, सकाळी 9 वाजून 30 मिनिट
चौथा सामना, 14 मार्च, सकाळी 9 वाजून 30 मिनिट
पाचवा सामना, 17 मार्च, सकाळी 9 वाजून 30 मिनिट
पहिली टी 20 सामना, 20 मार्च, संध्याकाळी 7 वाजता
दुसरा टी 20 सामना, 21 मार्च, संध्याकाळी 7 वाजता
तिसरा टी 20 सामना, 23 मार्च, संध्याकाळी 7 वाजता
वरील सर्व सामने हे लखनऊमधील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या :
(south africa Womens squad for odi and t20i series against India announced)