मुंबई : देशभर कोरोनाचा उद्रेक होत असताना आता आयपीएललाही कोरोनाने गाठल्यानंतर थाटात सुरु असलेला आयपीएल 2021 चा (IPL 2021) 14 वा हंगाम स्थगित करण्यात आला. या स्पर्धेत एकूण एकूण 29 सामने खेळले गेले. उर्वरित सामने अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले. आयपीएल स्थगित झाल्यानंतर क्रिकेट रसिकांना, खेळाडूंना आयपीएल स्पर्धेची आठवण येत आहे. दक्षिण आफ्रिकेचा तडाखेबाज खेळाडू फॅफ डू प्लेसीसने आयपीएलच्या आठवणीत एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. (South African Cricketer Faf Du plessis Write Emotional Post During Covid 19)
आयपीएल स्थगितीची घोषणा झाल्यानंतर भारतीय खेळाडूंबरोबर परदेशी खेळाडूंचाही हिरमूड झालाय. जशी आयपीएल स्थगित झालीय तसे परदेशी खेळाडू विविध पोस्ट करुन आयपीएलच्या आठवणींना उजाळा देत आहेत. दक्षिण आफ्रिकन खेळाडू तथा चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर फॅफ डू प्लेसीस याने एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने आयपीएलची आठवण येत असल्याचं म्हटलं आहे.
“आयपीएलचं 14 वं पर्व तसंच चेन्नईच्या परिवाराला सोडून जाण्याचं दु:ख होतंय. आमची टीम 14 व्या पर्वात शानदार फॉर्मात होती. मी भारतीय लोकांसाठी सतत प्रार्थना करतोय कारण या कठीण प्रसंगातून ते लवकरात लवकर बाहेर येवोत, आपण स्वत:ची आणि कुटुंबीयांची काळजी घ्या”, असं फॅफने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
आयपीएलचा 13 वा मोसम चेन्नईसाठी विशेष राहिला नव्हता किंबहुना साखळी फेरीतच चेन्नई गारद झाली होती. परंतु आयपीएलच्या 14 व्या पर्वात चेन्नईने बहारदार परफॉर्मन्स केला. चेन्नईने एकूण 7 मॅचेस खेळल्या ज्यापैकी 5 मॅचेसमध्ये त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना पराभवाची धूळ चारली.
(South African Cricketer Faf Du plessis Write Emotional Post During Covid 19)
हे ही वाचा :
भारताच्या धडाकेबाज क्रिकेटपटूवर दुःखाचा डोंगर, आईपाठोपाठ बहिणीचा कोरोनाने मृत्यू
कोरोनाकाळात घोडेसवारी, रवींद्र जाडेजा म्हणतो, ‘मी आता पूर्णपणे सुरक्षित…!’
क्रिकेट विश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला, 36 वर्षीय विवेक यादवचं कोरोनाने निधन