एका बाजूला खेळाडूंना पंचतारांकित हॉटेलमध्ये (Five Star Hotel) व्यवस्था तर एक बाजूला खेळाडूंची (Sports Player) वाईट अवस्था असं चित्र सद्या पाहायला मिळत आहे. कारण क्रिकेटसह (Cricket) अन्य खेळाडूंना उच्च दर्जाची व्यवस्था केली जाते. परंतु लखनऊमधील सहारनपुरमध्ये एक विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. देशभरात हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संबंधित क्रीडा अधिकाऱ्याला निलंबित केल्याची माहिती मिळाली आहे.
Food served to kabaddi players in #UttarPradesh kept in toilet. Is this how #BJP respects the players? Shameful! pic.twitter.com/SkxZjyQYza
हे सुद्धा वाचा— YSR (@ysathishreddy) September 20, 2022
उत्तरप्रदेश राज्यातील सहारनपुरमध्ये एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये कब्बडीच्या खेळाडूंना टॉयलेटमध्ये जेवण देण्यात आले आहे. ही बाब निर्दशनास आल्यानंतर क्रीडा अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे.
ज्यावेळी अधिकारी अनिमेष सक्सेना यांच्यावर आरोप करण्यात आला. त्यावेळी त्यांनी हा आरोप फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला. तसेच पाऊस आल्यामुळे स्विमिंग पूलच्या शेजारी जेवणं ठेवल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
उघडीस आलेल्या प्रकारामुळे अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यातून अनेकांनी टीका केली आहे. तसेच काही लोकांनी भाजप सरकारवरती पुन्हा टीका केली आहे.
एकाचवेळी अनेक खेळाडू असल्यामुळे सर्व खेळाडूंची मैदानात जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. पण जेवण टॉयलेटमध्ये कोणी ठेवलं याबाबत कुठलीही माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.