चेन्नई : शाहबाज अहमदने एका ओव्हरमध्ये घेतलेल्या 3 विकेट्सच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सनरायजर्स हैदराबादवर 6 धावांनी विजय मिळवला आहे. ग्लेन मॅक्सवेलच्या अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सनरायजर्स हैदराबादला विजयासाठी 150 धावांचे आव्हान दिले होते. मात्र हैदराबादला बंगळुरुच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 143 धावाच करता आल्या. बंगळुरुकडून शाहबाज अहमदने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. हैदराबादकडूने कर्णधार डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 54 धावांची खेळी केली. (srh vs rcb live score ipl 2021 match sunrisers hyderabad vs royal challengers bangalore scorecard online ma chidambaram stadium chennai in marathi)
SRH vs RCB Live Score साठी क्लिक करा
विराटसेनेने सनरायजर्स हैदराबादवर 6 धावांनी विजय मिळवला आहे. बंगळुरुने हैदराबादला विजयासाठी 150 धावांचे विजयी आव्हान दिले होते. मात्र बंगळुरुच्या गोलंगदाजांसमोर हैदराबादला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 143 धावाच करता आल्या. बंगळुरुचा हा सलग दुसरा विजय ठरला.
हैदराबादला विजयासाठी 6 चेंडूत 16 धावांची आवश्यकता आहे. सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे.
हैदराबादला विजयसाठी 2 ओव्हरमध्ये 27 धावांची आवश्यकता असताना राशिद खानने 19 व्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर सिक्स खेचला.
हैदराबादला सहावा धक्का बसला आहे. हर्षल पटेलने कर्णधार विराट कोहलीच्या हाती विजय शंकरला आऊट केलं आहे.
हैदराबादने सलग 2 चेंडूत 2 विकेट्स गमावल्या आहेत. शहबाज अहमदने जॉनी बेयरस्टो आणि मनिष पांडे या सेट फलंदाजांना आऊट केलं. त्यामुळे सामना बंगळुरुच्या बाजूने झुकला आहे.
हैदराबादला विजयासाठी 4 ओव्हर्समध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. मनिष पांड आणि जॉनी बेयरस्टो ही जोडी खेळत आहे.
हैदराबादला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नर आऊट झाला आहे. वॉर्नरने 37 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकारासह 54 धावांची खेळी केली.
हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 31 चेंडूत शानदार अर्धशतक झळकावलं आहे. वॉर्नर आणि मनिष पांडेच्या अर्धशतकापेक्षा अधिक धावांच्या भागीदारीमुळे हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचला आहे.
.@davidwarner31 leading from the front with a well-made FIFTY off 31 deliveries.
Live – https://t.co/kDrqkM24yz #SRHvRCB #VIVOIPL pic.twitter.com/8uPDb0OM8K
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2021
डेव्हिड वॉर्नर-मनिष पांडेची जोडी जमली आहे. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकापेक्षा जास्त धावांची भागीदारी केली आहे. त्यामुळे हैदराबाद मजबूत स्थितीत आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नर अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे.
हैदराबादने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 50 धावा केल्या आहेत. हैदराबादने रिद्धीमान साहाची एकमेव विकेट गमावली. दरम्यान आता कर्णधार डेव्हिड वॉर्नर आण मनिष पांडे मैदानात खेळत आहेत.
At the end of the powerplay #SRH are 50/1
Live – https://t.co/kDrqkM24yz #SRHvRCB #VIVOIPL pic.twitter.com/nJpwQzPBsE
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2021
मनिष पांडेने सामन्यातील चौथ्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर कायले जेमिन्सनच्या गोलंदाजीवर क्लास सिक्स खेचला.
हैदराबादने पहिली विकेट गमावली आहे. रिद्धीमान साहा आऊट झाला आहे. रिद्धीमानला मोहम्मद सिराजने ग्लेन मॅक्सवेलच्या हाती कॅच आऊट केलं आहे. रिद्धीमानने 1 धाव केली.
हैदराबादच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि रिद्धीमान साहा ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे. हैदराबादला विजयासाठी 150 धावांची आवश्यकता आहे.
ग्लेन मॅक्सवेलच्या अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सनरायजर्स हैदराबादला विजयासाठी 150 धावांचे आव्हान दिले आहे. बंगळुरुने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 149 धावा केल्या. बंगळुरुकडून मॅक्सवेलने सर्वाधिक 59 धावा केल्या. तर कर्णधार विराट कोहलीने 33 धावांची खेळी केली.
Match 6. 19.6: WICKET! G Maxwell (59) is out, c Wriddhiman Saha b Jason Holder, 149/8 https://t.co/apVryOi84X #SRHvRCB #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2021
बंगळुरुने सातवी विकेट गमावली आहे. कायले जेमिन्सन आऊट झाला आहे.
बंगळुरुला पाचवा धक्का बसला आहे. वॉशिंग्टन सुंदर आऊट झाला आहे.
बंगळुरुला मोठा धक्का लागला आहे. एबी डीव्हीलियर्स आऊट झाला आहे. त्यामुळे बंगळुरुची 95-4 अशी स्थिती झाली आहे. एबीने 1 धाव केली.
बंगळुरुला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार विराट कोहली आऊट आऊट झाला आहे. सामन्यातील 13 व्या ओव्हरमधील पहिल्या चेंडूवर विराटने जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र विजय शंकरने अचूक कॅच घेतला. विराटने 33 धावा केल्या.
शाहबाद नदीमने सामन्यातील 11 व्या ओव्हरमध्ये 22 धावा लुटल्या. या ओव्हरमध्ये बंगळुरुच्या ग्लेन मॅक्सवेल आणि विराट कोहलीने 22 धावा फटकावल्या. या ओव्हरमध्ये एकूण 2 सिक्स 2 चौकार आणि 2 सिंगल धावा घेतल्या.
बंगळुरुने दुसरी विकेट गमावली आहे. शाहबाज नदीमच्या रुपात दुसरा धक्का बसला आहे. नदीम 7 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर फटका मारण्याच्या नादात 14 धावांवर बाद झाला.
बंगळुरुने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 47 धावा केल्या आहेत. कर्णधार विराट कोहली आणि शाहबाज नदीम मैदानात खेळत आहेत.
बंगळुरुला पहिला धक्का बसला आहे.देवदत्त पडीक्कल आऊट झाला आहे. देवदत्तने 11 धावा केल्या.
विराटने बंगळुरुची आणि स्वत:च्या खेळीची सुरुवात चौकाराने केली आहे. विराटने भुवनेश्वर कुमारच्या बोलिंगवर सामन्यातील पहिल्याच ओव्हरमधील दुसऱ्या चेंडूवर चौकार खेचला.
बंगळुरुच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. विराट कोहली -देवदत्त पडीक्कल सलामी जोडी मैदानात खेळत आहे.
विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडीक्कल, ग्लेन मॅक्सेवेल, एबी डीव्हीलियर्स, शाहबाज अहमद,डॅनियल ख्रिस्टियन, वॉशिंगटन सुंदर, कायले जेमिन्सन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल.
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), रिद्धिमान साहा, मनीष पांडे, जॉनी बेयरस्टो, जेसन होल्डर, राशिद खान, विजय शंकर, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन आणि शहबाज नदीम.
आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत. सनरायजर्स हैदराबादने संघात 2 तर बंगळुरुने 1 बदल केला आहे.
फिरकीपटू युजवेंद्र चहलचा हैदराबाद विरुद्धचा हा सामना बंगळुरुकडून खेळतानाचा 100 वा आयपीएल सामना आहे. त्यामुळे या सामन्यात चहलकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
Bold Diaries: Yuzvendra Chahal’s 100th IPL match for RCB
Virat Kohli, AB de Villiers, Glenn Maxwell, Harshal Patel, Siraj and the coaches wish @yuzi_chahal23 for his 100th match for RCB in the IPL.#PlayBold #WeAreChallengers #IPL2021 #DareToDream pic.twitter.com/1RAYFKCJr3
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 14, 2021
हैदराबादने टॉस जिंकला आहे. डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून बंगळुरुला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे.
Match 6. Sunrisers Hyderabad win the toss and elect to field https://t.co/apVryOi84X #SRHvRCB #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2021
आरसीबीसाठी सर्वाधिक धावा कर्णधार विराट कोहलीने फटकावल्या आहेत, तर हैदराबादसाठी सर्वाधिक धावा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने फटकावल्या आहेत. वॉर्नरने बंगळुरुविरुद्ध 593 धावा फटकावल्या आहेत. तर विराटने हैदराबाद विरुद्ध 531 धावा चोपल्या आहेत. त्यामुळे या सामन्यात या दोन्ही कर्णधारांमध्ये चांगलाचा सामना पाहायला मिळणार आहे.
आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 6 वा सामना सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला आता काही मिनिटे बाकी आहेत.
Hello & good evening from Chennai for Match 6 of the #VIVOIPL
David Warner's @SunRisers will be up against @RCBTweets, led by Virat Kohli.
Which side are you rooting for tonight? ??#SRHvRCB pic.twitter.com/LeCIOD0hVH
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2021