आशिया चषक (Asia cup 2022) सुरु झाल्यापासून सुर्यकुमार यादवची (Surykumar Yadav) बॅटिंग एकदम जोरात सुरु आहे. कमी सामन्यात अधिक धावा काढल्याचा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे. ऑस्ट्रेलिया (Australia), आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याने चांगली कामगिरी केल्याने त्याला रोखणं शक्य नसल्याचं रोहित शर्माने सांगितलं आहे.
सुर्यकुमार यादवने आजच्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची चांगली धुलाई केली. त्यामुळे आजही चर्चेत आहे, आज त्याने मैदानात चौफेर फटकेबाजी करुन सगळ्यांचं मनं जिंकलं.
सुर्यकुमार यादवची बॅंटिंग पाहून स्टार्कची बॉलिंग बिघडल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावर चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत.
मोहम्मद शमीने शेवटच्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या चार फलंदाजांना बाद झाले. त्यामुळे टीम इंडियाचा विजय झाला.
टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विश्व के.), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
ऑस्ट्रेलियन टीम
अॅरॉन फिंच (कर्णधार), मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, मार्कस स्टॉइनिस, अॅश्टन अगर, पॅट कमिन्स, टिम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, अॅडम झम्पा .