कॅनबरा : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज आता क्रिकेट नव्हे तर क्रिकेटनंतरच्या त्याच्या करियरचा विचार करत आहे. त्याचं क्रिकेट करियर सध्या तरी सेट आहे. परंतु क्रिकेटनंतर पुढे काय करायचं याचं प्लॅनिंग त्याने आत्तापासूनच सुरु केलं आहे. त्याच्या तयारीवर स्मिथने लक्ष केंद्रित करण्यास सुरूवात केली आहे. स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) स्वतःचा एक नवीन व्यवसाय सुरू केला आहे. त्याने स्वत: सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली आहे. (Steve Smith going to become Businessman like MS Dhoni, Starting Cricket Academy)
ऑस्ट्रेलियाच्या या स्टार फलंदाजाने ज्या व्यवसायात पाऊल ठेवलं आहे, हा व्यवसाय भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने सुरू केलेल्या व्यवसायासारखाच आहे. खरंतर, हल्ली हा व्यवसाय अनेक क्रिकेटपटूंची पहिली पसंती बनत चालला आहे. तुम्हाला समजलंच असेल आम्ही कोणत्या व्यवसायाबद्दल बोलतोय. जर तुम्हाला नसेल समजलं तर सांगतो. हा व्यवसाय आहे क्रिकेट कोचिंगचा (क्रिकेट प्रशिक्षण). स्टीव्ह स्मिथने क्रिकेट कोचिंगचा नवीन व्यवसाय सुरू केला आहे, ज्याबद्दल त्यांने स्वतः माहिती दिली आहे.
स्टीव्ह स्मिथ त्याच्या नावाने क्रिकेट कोचिंग अकादमी सुरू करणार आहे. त्याची क्रिकेट अकादमी अद्याप सुरू झालेली नाही, पण लवकरच होईल. क्रिकेट अकादमीच्या माध्यमातून स्मिथने लहान मुलांना क्रिकेटचे धडे देण्याचा मानस धरला आहे. ज्या मुलांना भविष्यात आपल्या देशासाठी खेळायचे आहे, त्यांच्या पंखांना बळ देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्मिथने सांगितले. स्मिथच्या या अकादमीमध्ये क्रिकेटपटू बनण्याचं स्वप्न उरी बाळगून असलेल्या तरुणांना त्यांच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे मिळतील.
स्मिथने शेयर केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता की स्मिथच्या क्रिकेट अकादमीची जोरदार तयारी सुरू आहे. अकादमी सुरू होताच तरुण खेळाडूंना प्रशिक्षण देण्याची प्रक्रियाही सुरू होईल.
स्टीव्ह स्मिथ सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. तो फॅब फोरमधील चार सदस्यांपैकी एक आहे, त्याच्या व्यतिरिक्त भारती संघाचा कर्णधार विराट कोहली, इंग्लंज संघाचा कर्णधार जो रूट आणि न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसन अशी आणखी तीन नावे यामध्ये आहेत. या 4 फलंदाजांमध्ये धावा आणि विक्रमांबाबत नेहमीच स्पर्धा सुरु असते.
Are you looking to improve your cricket in 2021? The Steve Smith Cricket Academy is launching soon. I would love to hear what tips you need. Let me know! #SteveSmithCricketAcademy #SSCA #cricket #comingsoon pic.twitter.com/LQYYsS2Yrt
— Steve Smith (@stevesmith49) March 17, 2021
इतर बातम्या
ICC कडून नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ‘या’ 2 खेळाडूंवर 8 वर्षांची बंदी
ind Vs Eng : इंग्लंडचा भारतावर दिमाखदार विजय, टीम इंडियाच्या पराभवाची पाच कारणे!
India vs England T20I Series | टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी, ‘यॉर्कर किंग’ पुनरागमनासाठी सज्ज
(Steve Smith going to become Businessman like MS Dhoni, Starting Cricket Academy)