मेलबर्न : आशिया चषकापासून (Asia Cup 2022) ज्या गोलंदाजाची गरज होती, तो गोलंदाज सध्या टीम इंडियामध्ये (Team India) दाखल झाला असल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. कारण आशिया चषक, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेमध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली नाही. त्यामध्ये विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया कशी कामगिरी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. परंतु शमीने (Mohammad Shami) सगळ्यांना धक्का दिला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथील मैदानात सराव मॅच संधी मिळाल्यानंतर शमीने चांगली गोलंदाजी करुन कर्णधार आणि चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये चार चेंडूत चार विकेट घेतल्यामुळे त्याची अधिक चर्चा झाली. तसेच बुमराहची जागा तो भरुन काढू शकतो अशी देखील सोशल मीडियावर चर्चा आहे.
India Win The Warm-Up Game Against Australia!
Mohammad Shami bowled 1 over!
4 wickets in 4 balls (1 run out)!
2,2,W,W,W,W
Champion bowler!! #indvaus
Thats why experience matters a lot#MohammadShami ??#Cricket #INDvAUS #AUSvIND #T20WorldCup #MoahmmedShami #ViratKohli pic.twitter.com/MBxIhs1Nlo— Journalist_Rakshit Yadav (@RakshitYadav25) October 17, 2022
शमी अनेक टीमसाठी घातक गोलंदाज ठरणार आहे. कारण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये त्याने भेदक गोलंदाजी करुन अनेकांना शांत केले आहे. टीम इंडियामध्ये सध्या सगळे फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.
हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, हार्दिक पंड्या,अक्षर पटेल इत्यादी गोलंदाजांनी शमीला साथ दिल्यानंतर टीम इंडिया विश्वचषक जिंकू शकते असं विधान अनेकांनी केलं आहे.
T20 विश्वचषकासाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.