Prithvi Shaw | मास्टर ब्लास्टरनं असा काय सल्ला दिला की, पृथ्वीनं रन्सचा पाऊस पाडला?

| Updated on: Mar 13, 2021 | 6:34 PM

पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) विजय हजारे करंडकातील 7 सामन्यात 4 शतकांसह 700 पेक्षा अधिक धावा चोपल्या आहे. सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) सल्ला ऐकल्याने यशस्वी ठरलो, असंही पृथ्वीने म्हटलं.

Prithvi Shaw | मास्टर ब्लास्टरनं असा काय सल्ला दिला की, पृथ्वीनं रन्सचा पाऊस पाडला?
पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) विजय हजारे करंडकातील 7 सामन्यात 4 शतकांसह 700 पेक्षा अधिक धावा चोपल्या आहे. सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) सल्ला ऐकल्याने यशस्वी ठरलो, असंही पृथ्वीने म्हटलं.
Follow us on

मुंबई : मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉ विजय हजारे स्पर्धेत जोरदार कामगिरी करत आहे. पृथ्वीने या स्पर्धेत साखळी सामन्यांपासून ते बाद फेरीतील सर्व सामन्यांमध्ये आपल्या बॅटने अफलातून कामगिरी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर मुंबई विजय हजारे करंडकाच्या अंतिम फेरीत पोहचली आहे. या अंतिम फेरीत मुंबई विरुद्ध उत्तर प्रदेश यांच्यात सामना रंगणार आहे. दरम्यान पृथ्वीने आपल्या या शानदार कामगिरी मागचं रहस्य उलगडलं आहे. सचिन तेंडुलकरने दिलेल्या सल्ल्यामुळे मी यशस्वी ठरलो, असा खुलासा पृथ्वीने केला आहे. (Success came on the advice of Sachin Tendulkar said prithvi shaw)

पृथ्वी काय म्हणाला?

“मी ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतात परतलो. त्यानंतर सचिन सरांना भेटलो. त्यांनी मला चेंडू शरीराजवळ खेळण्याचा सल्ला दिला. पण मी चेंडू उशिराने खेळत होतो. असं कदाचित मी आयपीएलमध्ये खेळत असल्याने होत असावं. दरम्यान मी सचिन सरांचा सल्ला ऐकला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना यावर फार मेहनत घेतली. मी आतापर्यंत संपूर्ण क्रिकेट बॅट शरीराजवळ न ठेवता खेळलो आहे. पण मला हीच सवय बदलायची होती. हे माझ्यासाठी फार आव्हानात्मक होतं. पण मी यावर फार मेहनत घेतली. सचिन सरांचा सल्ला ऐकला. त्याचा मला फायदा झाला”, असं पृथ्वीने स्पष्ट केलं. पृथ्वीने एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळेस तो बोलत होता.

“रवी शास्त्री सरांचं मार्गदर्शन”

“दरम्यान मी ही सवय बदलण्यासाठी नेट्समध्ये खूप मेहनत घेतली. यावेळेस टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि बॅटिंग कोच विक्रम राठोड यांनी मला माझी चूक लक्षात आणून दिली. ती चूक मी दुरुस्त केली”, असंही पृथ्वीने स्पष्ट केलं.

पृथ्वीची शानदार कामगिरी

पृथ्वी या स्पर्धेत सुरुवातीपासून शानदार कामगिरी करतोय. त्याने आतापर्यंत या मोसमातील एकूण 7 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 230 च्या अधिकच्या सरासरीने आणि 130 च्या स्ट्राईक रेटने 700 पेक्षा अधिक धावा चोपल्या आहेत. यामध्ये त्याने 4 यासह पृथ्वी या स्पर्धेतील एका मोसमात 700 पेक्षा अधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

सामनानिहाय कामगिरी

पृथ्वीने या स्पर्धेतीची सुरुवात शतकाने केली. त्याने पहिल्या सामन्यात दिल्ली विरुद्ध 105 धावा केल्या. महाराष्ट्र्र विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात 34 धावांची खेळी केली. तिसरा सामना पुड्डेचरी विरोधात खेळवण्यात आला. यावेळस त्याने द्विशतक लगावलं. पृथ्वीने या सामन्यात नाबाद 227 धावा केल्या. राजस्थान विरुद्धच्या चौथ्या सामन्यात 36 धावांची खेळी केली. हिमाचल विरुद्धच्या पाचव्या मॅचमध्ये अयशस्वी ठरला. पृथ्वी 2 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर पृथ्वीने क्वार्टर फायनलमध्ये सौराष्ट्र विरुद्ध 185 धावांची नाबाद खेळी केली. तर कर्नाटक विरुद्धच्या सेमी फायनल सामन्यात 165 धावांची खेळी केली.

अंतिम सामना 14 मार्चला

दरम्यान आता विजय हजारे करंडकाचा विजेता उद्या 14 मार्चला ठरणार आहे. मुंबई विरुद्ध उत्तर प्रदेश जेतेपदासाठी आमनेसामने भिडणार आहेत. त्यामुळे पृथ्वीकडून जोरदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे. यामुळे पृथ्वी आता फायनलमध्ये कशी कामगिरी करतो, याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांच लक्ष असणार आहे.

संबंधित बातम्या :

vijay hazare trophy 2021 | पृथ्वी शॉचा धमाका, विक्रमाला गवसणी, मयंक अग्रवालचा रेकॉर्ड ब्रेक

Vijay Hazare Trophy, Karnataka vs Mumbai, Semi Final | पृथ्वीचा झंझावात, कर्नाटकाला दणका, षटकारांचा पाऊस, चौथं शतक ठोकलं

(Success came on the advice of Sachin Tendulkar said prithvi shaw)