पुणे : हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) यंगर ब्रदर क्रुणाल पांड्याने (Krunal Pandya) डेब्यू मॅचमध्ये पराक्रम केला. अवघ्या 26 चेंडूत त्याने अर्धशतक ठोकून पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक जलद फिफ्टी ठोकण्याचा रेकॉर्ड त्याने आपल्या नावे नोंद केला आहे. त्याच्या अफलातून बॅटींगने क्रिकेट रसिक प्रेक्षक भलतेच खूश झालेत. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंना देखील क्रुणालच्या खेळीची भुरळ पडलीय. लिटील मास्टर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी क्रुणालच्या खेळीचं तोंडभरुन कौतुक केलंय. (Sunil Gavaskar Appriciate krunal pandya for Fantastic inning Against England 1st one Day Match)
क्रुणालची पहिल्या सामन्यातली बॅटिंग बघून सुनील गावस्कर आनंदित झालेत. क्रुणालच्या बॅटिंगचं वर्णन गावस्कर यांनी शानदार आणि निडर अशा दोन शब्दात केलं आहे. स्टार स्पोर्ट्सवर कॉमेन्ट्री करताना गावस्कर म्हणाले, “आपल्याला हे विसरुन चालणार नाही की क्रुणाल त्याचा पदार्पणाचा सामना खेळतोय. पदार्पणाच्या सामन्यात अशी फलंदाजी करणं हे कोणत्याही फलंदाजासाठी अवघड असतं. क्रीजवर पाय ठेवल्यापासूनच क्रुणालने मोठे फटके खेळायला सुरुवात केली जसं काय तो ड्रेसिंग रुममधूनच सेट होऊन आला होता.”
क्रुणालच्या खेळात मला खेळभावना दिसली. कारण त्याने सुरुवातील आक्रमक फटके खेळून के.एल. राहुलवर असलेला दबाव झटकून टाकला. राहुल गेल्या काही मॅचपासून त्याच्या फॉर्मशी घगडत होता. त्याला एका चांगल्या खेळीची गरज होती. अशा परिस्थितीत क्रुणालने त्याला वेळ दिला आणि चांगले फटके खेळण्यास प्रोत्साहित केलं. सुरुवातीचा अडखळणाऱ्या राहुलचं प्रेशर त्याने आक्रमक फटके खेळून दूर केलं. क्रुणालने सुरुवातीला आक्रमक फटके खेळून राहुलचं काम सोपं केलं. हीच टीम भावना असते. आपल्या सहकारी खेळाडूवरचं प्रेशर कमी करणं आणि त्याला प्रोत्साहित करणं, या पलीकडे संघभावना काय असू शकते…?, असं म्हणत गावस्कर यांनी क्रुणालच्या खेळीचं तोंडभरुन कौतुक केलं.
कृणालने एकदिवसीय पदार्पणात वेगवान अर्धशतक झळकावण्याची कामगिरी केली आहे. कृणालने इंग्लंडच्या जॉन मॉरीस यांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. मॉरीसने 1990 मध्ये 35 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. तर कृणालने 26 चेंडूत वेगवान अर्धशतक पूर्ण केलं. कृणालने 31 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 58 धावांची खेळी केली.
हे ही वाचा :
Krunal Pandya : क्रुणाल पांड्याचा झंझावात, 283 बॉलमध्ये 375 रन्स, मैदानाला आग लावली!