‘कृपया धोनीला एकटं सोडा’, गावस्करांची विनंती

| Updated on: Jul 05, 2019 | 4:39 PM

मुंबई : ‘सलग धावा काढत नसला, तरी धोनी टीमसाठी किती महत्त्वाचा आहे, याचा अंदाजही आपण लावू शकत नाही’, असे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी म्हटले. 2018 या वर्षात धोनी एकही अर्धशकत करु शकला नाही, त्यामुळे क्रिकेटचाहते त्याच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करत होते. त्यावर आता गावस्करांनी धोनीची बाजू घेतली आहे. भारतीय क्रिकेट विश्वात सध्या दोनदा विश्व […]

‘कृपया धोनीला एकटं सोडा’, गावस्करांची विनंती
Follow us on

मुंबई : ‘सलग धावा काढत नसला, तरी धोनी टीमसाठी किती महत्त्वाचा आहे, याचा अंदाजही आपण लावू शकत नाही’, असे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी म्हटले. 2018 या वर्षात धोनी एकही अर्धशकत करु शकला नाही, त्यामुळे क्रिकेटचाहते त्याच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करत होते. त्यावर आता गावस्करांनी धोनीची बाजू घेतली आहे.

भारतीय क्रिकेट विश्वात सध्या दोनदा विश्व चषक विजेता ठरलेल्या माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या फॉर्मबाबत खूप चर्चा होते आहे. मात्र, अॅडिलेडमध्ये सुरु असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 55 धावा काढत धोनीने त्याचं महत्त्व पटवून दिलं आहे. या सामन्याच्या शेवटच्या षटकात धोनीने षटकारही मारला, जो त्याचा ट्रेडमार्क आहे.

गावस्कर यांनी ‘इंडिया टुडे’ला सांगितले की, ‘कृपया या खेळाडुला (धोनी) एकटं सोडा, तो चांगली कामगिरी करत राहील. तो आता तरुण होत नाहीये, त्याचं वय वाढत चाललं आहे. त्यामुळे कमी वयात जे सातत्य खेळात असतं, ते निश्चितच आता राहाणार नाही आणि तुम्हाला हे सहन करावं लागेल. तो टीमसाठी आजही खूप महत्त्वाचा आहे. आपण त्याच्या टीममधील महत्त्वाचे मूल्यांकन करू शकत नाही.’

‘धोनी नेहमी गोलंदाजानांना सांगत असतो की, वेग-वेगळे चेंडू टाका. फलंदाज काय करण्याचा प्रयत्न करत आहे, हे त्याला कळतं. फलंदाज कुठला शॉट लावायच्या तयारीत आहे, फलंदाज काय विचार करतो आहे? हे धोनीला समजतं’, असेही गावस्करांनी सांगितले.

‘या प्रकारे तो गोलंदाजांची मदत करतो. तो फिल्डिंग लावण्यात विराट कोहलीला मदत करतो. तेव्हाच विराटला शेवटच्या षटकांत बाउंड्रीजवळ फिल्डिंग करायला मिळते, जिथे तो डाईव्ह मारत धावा रोखण्याचा प्रयत्न करतो. तो कॅच पकडू शकतो’, असे गावस्कर म्हणाले. तसेच ‘मला वाटतं की, विराटला गोलंदाजांसोबत बोलणे किंवा फिल्डिंग लावून खेळाडूंशी समन्वय राखणे शक्य नसतं, तेव्हा त्याला धोनीवर पूर्ण विश्वास असतो’, असेही गावस्कर म्हणाले.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्स राखून पराभव केला. या सामन्यात विराट कोहलीने शतक ठोकले, तर धोनीच्या नाबाद 55 धावांच्या खेळीनेही भारताच्या विजयात मोलाचा वाटा निभावला.