मुंबई : टीम इंडियामध्ये (IND) समतोल नसल्याचं कालच्या मॅचमध्ये जाणवलं. कारण टीम इंडियाच्या खेळाडूंनी कालच्या एकदिवसीय मॅचमध्ये खराब फिल्डींग केली. त्याचा परिणाम म्हणजे टीम इंडियाचा कालच्या मॅचमध्ये बांगलादेशकडून (BAN) पराभव झाला. तेव्हापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक खेळाडूंवर टीका करण्यात आली आहे. कालचा पराभव टीम इंडियाच्या माजी खेळाडूंच्या सुद्धा अधिक जिव्हारी लागला आहे. सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी एका महत्त्वाच्या खेळाडूवर टीका केली आहे.
टीम इंडियाचा माजी खेळाडू सुनिल गावसकर नेहमी टीमला चांगले सल्ले देत असतो. कालची मॅच टीम इंडिया हरल्यानंतर त्यांनी थेट रोहित शर्माला पराभवाला जबाबदार धरलं आहे. त्याचं कारण असं आहे की, टीम इंडियाने कालच्या मॅचमध्ये कमी धावा केल्यामुळे त्यांचा पराभव झाला असल्याचे गावसकर यांनी सांगितले. टीम इंडियाची धावसंख्या 250 असायला हवी होती. पण टीम इंडियाने कमी धावा केल्यामुळे टीमचा पराभव झाला.
दुसऱ्या मॅचमध्ये टीम इंडियाला चांगली कामगिरी करावी लागणार आहे, कारण उद्याचा सामना समजा बांगलादेशने जिंकला, तर मालिका बांगलादेश जिंकेल. त्यामुळे उद्याच्या सामन्याकडे सगळ्या क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज, कुलदीप सेन.
बांगलादेशची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
लिटन दास (कर्णधार, यष्टिरक्षक), नजमुल हुसेन शांती, यासिर अली, आसिफ हुसैन, महमुदुल्लाह रियाद, मेहदी हसन मिराज, शकीब अल हसन, मुस्तफिजुर रहमान, नमस अहमद, इबादत हुसेन.