अॅडलेड : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटीच्या पहिल्याच दिवशी टीम इंडियाची दाणादाण उडाली. मात्र, चेतेश्वर पुजाराने शतकी खेळीसह डाव सावरला आणि भारताची लाजही राखली. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला खरा, पण सुरुवातीपासूनच एक-एक करत खेळाडू तंबूत परतू लागले. अखेर चेतेश्वर पुजाराने सर्वोत्तम कामगिरी करत, भारताची धावसंख्या सुस्थितीत आणली. पहिल्या दिवशी 9 खेळाडूंच्या बदल्यात भारताने 250 धावा बनवल्या.
भारतीय गोलंदाजांना ऑस्ट्रेलियन खेळपट्टीवर खास कमाल दाखवता आली नाही. सलामीवीर जोडीही स्वस्तात माघारी परतली आणि त्यानंतर आलेला कर्णधार विराट कोहलीही काही खास करु शकला नाही. एका चमत्कारी झेलवर विराट कोहलीला माघारी परतावं लागलं.
Incredible from @Uz_Khawaja! #AUSvIND | @bet365_aus pic.twitter.com/eLgBLnQssM
— cricket.com.au (@cricketcomau) December 6, 2018
उस्मान ख्वाजाने विराट कोहलीचा जबरदस्त झेल घेतला आणि त्याला माघारी पाठवलं. पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर विराटने कट शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. हा शॉट चांगला असला तरी तिथे चतूर क्षेत्ररक्षक उभा होता. ख्वाजाने हवेत उडी घेत विराटचा झेल घेतला.
विराट कोहलीकडून भारतीय संघाला आणि प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा होत्या. कारण, चेतेश्वर पुजाराचा अपवाद वगळला तर कुणीही टिकून खेळू शकलं नाही. पण विराटचीही हीच परिस्थिती झाली. 16 चेंडूंमध्ये विराटला फक्त तीन धावा करता आल्या.
रोहित शर्माचा विक्रम
रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक दावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत एका स्थानाने झेप घेतली. त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीला मागे टाकलं. वन डे, कसोटी आणि टी-20 सामन्यात मिळून रोहितच्या नावावर एकूण 11170 धावा होत्या, ज्या आज 11206 झाल्या.
शाहीद आफ्रिदीच्या नावावर वन डे, कसोटी आणि टी-20 मध्ये 11196 धावा आहेत. आफ्रिदीने कसोटीत 1716, वन डेत 8064 आणि टी-20 मध्ये 1416 धावा केल्या आहेत.