नवी दिल्ली : भारताचा क्रिकेट संघ आणि 2019 चा क्रिकेट विश्वचषक याबाबत माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने एक महत्त्वाचं मत व्यक्त केलं आहे (Suresh Raina on Cricket World Cup 2019). जर 2019 च्या विश्वचषकात भारतीय संघात अंबाती रायडू असता तर भारत हा विश्वचषक जिंकू शकला असता असं मत त्याने नोंदवलं. त्यावेळी अंबाती रायडू चौथ्या क्रमांकावर खेळायला हवा होता. एकदिवसीय विश्वकप 2019 साठी अंबातीला भारतीय संघात स्थान मिळालं नव्हतं. इतकंच नाही तर संपूर्ण मालिकेत संघातील अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले, मात्र त्यानंतरही अंबातीला संधी दिली गेली नाही. यानंतर अंबाती रायडूने निवृत्ती घेतली. मात्र, काही दिवसांनी त्याने घरेलू क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं.
2018 मध्ये अंबाती रायडू यो-यो टेस्टमध्ये फेल झाला होता आणि इंग्लंड दौऱ्यावर जाऊ शकला नाही. 33 वर्षाचा सुरेश रैना म्हणाला, “अंबाती रायडूचं टेस्टमध्ये फेल होणं आण त्याला संघात स्थान न मिळणं याने मी आनंदी नव्हतो. अंबातीला फेल केल्यावर मला त्याच्या जागेवर संघात घेण्यात आलं होतं. त्यामुळे मला वाईट वाटत होतं.”
“अंबाती टेस्टमध्ये फेल झाल्यावर संघात एक वेगळंच वातावरण तयार झालं होतं. अंबाती भारताच्या संघात चौथ्या क्रमांकाचा फलंदाज असायला हवा होता. कारण तो खूप मेहनत घेत होता. त्याला जेव्हा जेव्हा संधी मिळाली होती तेव्हा तेव्हा त्याने खूप चांगली कामगिरी केली होती. मात्र तरीही त्याला संघात स्थान मिळाले नव्हते,” असं सुरेश रैना म्हणाला.
अंबातीला संघात स्थान न मिळल्यानं संघात विचित्र वातावरण झालं होतं. मीही 2018 चा इंग्लंड दौऱ्याचा आनंद घेऊ शकलो नाही. कारण त्याच्या जागेवर मला घेतल्याने मलाही वाईट वाटत होते, अशी भावना रैनाने व्यक्त केली. अंबाती रायडू भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर सर्वोत्कृष्ट खेळाडू होता. जर तो भारतीय संघात असता तर भारत नक्कीच विश्व चषक जिंकू शकला असता, असं मत सुरेश रैनाने व्यक्त केलं.
दरम्यान, यूएईला जाण्याआधी चेन्नई सुपर किंग्जचा एक प्रशिक्षण कॅम्प आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी रायडूने केलेल्या फलंदाजीवर रैना चांगलाच खूश होता. तो चौथ्या क्रमांकासाठी उत्तम असल्याचं रैनाने म्हटलं. तो विश्वचषकात असता तर भारत 2019 चा विश्वकप जिंकू शकला असता असं मत रैनाने व्यक्त केलं.
सध्या अंबाती रायडू आणि सुरेश रैना दोघे सीएसकेसाठी आयपीएल 2020 मध्ये खेळत आहेत. या आयपीएल हंगामाची सुरुवात यूएईमध्ये 19 सप्टेंबरला होत आहे. रैनाने 15 ऑगस्टला धोनीसोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. रैना आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा बनवणारा सीएसकेमधील खेळाडू आहे.
हेही वाचा :
Suresh Raina | मी सुद्धा तुझ्यासोबत, धोनीपाठोपाठ रैनाचीही निवृत्तीची घोषणा
रोहित शर्माची ‘खेलरत्न’साठी शिफारस, चौथा क्रिकेटपटू ठरणार
छोट्या शहरातून राष्ट्रीय पातळीवर नाव, तू तरुणांचा आयडॉल, मोदींचं धोनीला भावनिक पत्र
Suresh Raina on Cricket World Cup 2019