नवी दिल्ली : दरोडेखोरांच्या हल्ल्यात काकांचे निधन झाल्यानंतर क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या आत्तेभावानेही प्राण सोडले. गंभीर जखमी झालेल्या रैनाच्या भावावर रुग्णालयात उपचार सुरु होते. तर त्याच्या आत्याची प्रकृती चिंताजनक आहे. (Suresh Raina’s cousin injured in robbery attack dies)
“माझ्या कुटुंबासोबत पंजाबमध्ये जे झाले ते भयावह होते. माझ्या काकांची हत्या करण्यात आली, माझी आत्या आणि दोघा आत्तेभावांना गंभीर जखमा झाल्या. दुर्दैवाने माझ्या आत्तेभावाचेही काल रात्री निधन झाले. गेले काही दिवस त्याची जीवनमृत्यूशी झुंज सुरु होती. माझ्या आत्याची प्रकृती अजूनही खूप गंभीर असून ती लाइफ सपोर्टवर आहे.” असे ट्वीट रैनाने केले आहे.
“आत्तापर्यंत आम्हाला समजले नाही, की त्या रात्री नेमके काय घडले आणि हे कोणी केले. मी विनंती करतो पंजाब पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालावे. हे घृणास्पद कृत्य कोणी केले, हे आम्हाला समजले पाहिजे. त्या गुन्हेगारांना सोडता कामा नये” असा शब्दात सुरेश रैनाने संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनाही रैनाने मेन्शन केलं आहे.
What happened to my family is Punjab was beyond horrible. My uncle was slaughtered to death, my bua & both my cousins had sever injuries. Unfortunately my cousin also passed away last night after battling for life for days. My bua is still very very critical & is on life support.
— Suresh Raina?? (@ImRaina) September 1, 2020
पंजाबच्या पठाणकोट जिल्ह्यात राहणाऱ्या रैनाच्या आत्याच्या कुटुंबावर शुक्रवार 28 ऑगस्टच्या रात्री दरोडेखोरांनी हल्ला केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुख्यात “काले कच्छेवाला” टोळीचे तीन ते चार दरोडेखोर चोरीच्या इराद्याने आले होते. पठाणकोटमधील माधोपूरजवळील थारियाल गावात राहणाऱ्या अशोक कुमार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर टोळीने हल्ला केला.
हल्ल्याच्या वेळी कुटुंबातील सर्व जण आपल्या घरातील गच्चीवर झोपले होते. 58 वर्षीय अशोक कुमार यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्याच रात्री त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. घरातील काही रोकड आणि सोने लुटून दरोडेखोरांनी पोबारा केला. (Suresh Raina’s cousin injured in robbery attack dies)
रैनाची आत्या आशा देवी, तिच्या 80 वर्षीय सासूबाई सत्या देवी, आत्तेभाऊ अपिन आणि कौशल जखमी झाले. मात्र त्यापैकी एका भावाचे सोमवारी रात्री उपचारादरम्यान निधन झाले. सत्या देवी यांना रुग्णालयातून घरी सोडले आहे, तर इतरांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. सुरेश रैना आणि अशोक कुमार कुटुंबातील नातेसंबंध सुरुवातीला अस्पष्ट होते, मात्र नंतर पोलिसांनी त्यास दुजोरा दिला.
आयपीएलमधून माघार
चेन्नईचा धडाकेबाज खेळाडू सुरेश रैना आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचे वृत्त समोर आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. रैना 29 ऑगस्टला तातडीने संयुक्त अरब अमिराती अर्थात UAE वरुन परतला. वैयक्तिक कारणात्सव त्याने माघार घेतल्याची माहिती सुरुवातीला समोर आली होती.
सुरेश रैनाची निवृत्ती
33 वर्षीय सुरेश रैनाने 15 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. महेंद्रसिंह धोनीने क्रिकेटला अलविदा केला, त्याच दिवशी त्याचा मित्र असलेल्या रैनानेही निवृत्ती जाहीर केली. मात्र रैना आयपीएलच्या सराव सत्रात सहभागी झाला होता. तो संघासोबत दुबईला रवाना झाला होता.
संबंधित बातम्या :
दरोडेखोरांचा हल्ला, क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या काकांचे निधन
श्रीनिवासन आधी म्हणाले रैनाच्या डोक्यात यशाची झिंग, आता म्हणतात…
(Suresh Raina’s cousin injured in robbery attack dies)