मुंबई : न्यूझीलंडविरुद्धच्या (NZ) दुसऱ्या T20 सामन्यानंतर टीम इंडियाच्या (Team India) स्टार खेळाडूचं सगळीकडे कौतुक पाहायला मिळत आहे. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) कामगिरीमुळे टीम इंडियाचा कालच्या सामन्यात मोठ्या फरकाने विजय झाला. मागच्या काही दिवसांपासून सुर्यकुमार यादव चांगल्या फॉर्ममध्ये आहे, तो सतत धावा करीत आहे. त्यामुळे त्यांच्या नावावर अनेक रेकॉर्ड झाले आहेत.
सुर्यकुमार यादवने विराट कोहलीचा एक रेकॉर्ड तोडला आहे. विशेष म्हणजे आता सुर्यकुमार यादवचा हा रेकॉर्ड आता कोणीही तोडू शकणार नाही असं वाटतंय. आता जगातील उर्वरित फलंदाजांसाठी मोठे आव्हान बनले आहे.
कालच्या सामन्यात सुर्यकुमार यादवने मोठी खेळी केली. कमी चेंडूत सुर्यकुमार यादवने शतक झळकावले आहे. त्यामुळे सुर्यकुमार यादवला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला आहे. सुर्यकुमार यादवने एका कॅलेंडर वर्षात सर्वात जास्त प्लेअर ऑफ द मॅच जिंकण्याचा कोहलीचा विक्रम मोडला आहे. विराट कोहलीने आतापर्यंतच्या कारकिर्दीत सहा वेळा हा पराक्रम केला आहे.
मालिका जिंकण्याच्या इराद्याने पुढचा सामना टीम इंडिया खेळणार आहे. कारण पुढचा सामना टीम इंडियाने जिंकला तर टीम इंडिया मालिका जिंकणार आहे. पुढच्या सामन्यात न्यूझिलंडच्या टीममध्ये मोठा बदल करण्यात आहे, कर्णधार विल्यमसन खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.