मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे सिरीजमध्ये 1-1 अशी बरोबरी आहे. त्यामुळे तिसरा आणि शेवटचा सामना निर्णयक ठरणार आहे. शेवटच्या सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादवच्या फॉर्मबाबत चिंता व्यक्त केली आहे. सूर्यकुमार यादवनं टी 20 सामन्यांमध्ये 1675 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 175 इतका आहे. टी 20 फॉर्मेटमध्ये तो प्रत्येक चेंडूला सामोरं गेला आहे. पण वनडेत मात्र याच्या उलट चित्र आहे. त्याच्या फॉर्मबाबत भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने याबाबत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.
“दुर्दैवी म्हणजे श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त आहे. तो चौथ्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करतो. तो त्या पोझिशनवर सेट झाला होता. या पोझिशनसाठी आम्ही गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न करतोय. आम्ही टी 20 सामने भरपूर खेळलो. पण वनडे सामने हवे तितके झाले नाहीत. पण दुखापतग्रस्त असला तरी आमच्याकडे बरेच पर्याय आहेत.”, असं राहुल द्रविडने सांगितलं.
“सूर्यकुमार यादवबाबत काळजी करण्याचं कारण नाही. पहिल्या दोन वनडेत दोन्ही चेंडू जबरदस्त होते. सूर्यकुमार यादव 50 षटकांचा खेळ शिकत आहे. टी 20 फॉर्मेट वेगळा आहे. तो दहा वर्षे आयपीएलमध्ये खेळला. दबावात क्रिकेट खेळला. पण वनडे क्रिकेट तितका खेळला नाही. त्याला खेळायला वेळ दिला पाहीजे. तो नक्कीच चांगलं करेल.”, असं राहुल द्रविडने सांगितलं.
सूर्यकुमार यादवच्या टी 20 यशामागे आयपीएलमधील प्रदर्शन आहे. खेळण्याची शैली आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा कमी नाही, असं राहुल द्रविडने सांगितलं. भारतानं या वर्षात आठ एकदिवसीय सामने खेळला आहे. आता नववा सामना चेन्नईत होणार आहे. टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध तीन, न्यूझीलंडविरुद्ध तीन आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन एकदिवसीय सामने खेळले आहेत.
तिसऱ्या वनडे बाबत विचारलं असता राहुल द्रविडनं आपलं मत मांडलं. विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून वनडेमध्ये त्याने जे काही करायचे आहे ते साध्य केले आहे का? त्यावर द्रविडने सांगितलं की, “उद्याचा निकाल काही असो. आम्हाला ती स्पष्टता निर्माण करणे आवश्यक आहे.”
सूर्यकुमार यादवनं फेब्रुवारी 2022 मध्ये 50 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. त्यानंतर आजपर्यंत 16 सामातन्य नाबाद 34 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. 32 वर्षीय सूर्यकुमार यादव आतापर्यंत 22 वनडे सामने खेळला आहे. यात त्याचा फलंदाजी सरासरी 25.47 इतकी आहे. सूर्यकुमार यादवने वनडेत एकूण 433 धावा केल्या आहेत.