मुंबई : सुर्यकुमार यादव (Suryakumar yadav)…. भारतीय क्रिकेट संघातील आघाडीचा फलंदाज… विराट कोहली (Virat kohli), महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्या बरोबर खेळलेला फलंदाज…. अल्पावधीत त्याने आपल्या बॅटिंगची जादू जगभरातील क्रिकेट रसिकांना दाखवलीय. हळूहळू आपलं स्थान तो भारतीय क्रिकेट संघात बळकट करतो आगे. आयपीएलमधेयही तो खोर्याने धावा करतो. सध्या आयपीएल स्थगित झाल्याने खेळाडूंजवळ रिकामा वेळ आहे. ते सोशल मीडियावर आपला वेळ व्यतित करतायत. एका लाईव्ह सेशनदरम्यान सूर्यकुमार यादवला चाहत्यांनी अडचणीचे प्रश्न विचारले. पण सूर्यकुमार डगमगला नाही. केवळ एका शब्दात त्याला क्रिकेटपटूंची वर्णन करायचं होती. त्याने हे अवघड काम करुन दाखवलं. (Suryaumar yadav on MS Dhoni Virat kohli Rohit Sharma)
सोशल मीडियावर अनेकवेळा क्रिकेट जगतात सगळ्यात महान क्रिकेटर कोणता, अशा चर्चा झडतात. यामध्ये मग सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा यांची नावे आपसुकच येतात. साहजिकच क्रिकेट चाहत्यांना असे प्रश्न सारखे सारखे पडत असतात. अशाच प्रश्नांची उत्तरं सूर्यकुमार यादवने चाहत्यांना दिली.
एका फॅन्सने सूर्यकुमार यादवला सचिन तेंडुलकरचं एका शब्दात वर्णन करायला सांगितलं. यावेळी सूर्यकुमार यादवने ‘क्रिकेटचा देव’ असं म्हणत सचिनच्या कारकीर्दीला शोभेल असं उत्तर दिलं. एका फॅन्सने विराट कोहलीबद्दल एका शब्दात विचारलं तर सूर्यकुमार यादव म्हणाला ‘प्रेरणादायक…’ धोनीबद्दल जेव्हा त्याला विचारलं गेलं तेव्हा त्याच्यासमोर एक शब्द आला तो होता लिजेंड्री…
यानंतर भारताचा तसंच मुंबई इंडियन्सचा ओपनर बॅट्समन रोहित शर्मा याच्याबद्दलही सूर्यकुमार यादवला विचारलं गेलं. सुर्यकुमार आणि रोहित शर्मा मुंबईकडून एकत्र खेळतात. सहाजिकच चहात्यांना उत्सुकता होती की रोहितबद्दल सूर्यकुमार यादव काय बोलतोय तर सुर्यकुमारने उत्तर दिलं ‘हिटमॅन’
सुर्यकुमार यादवने आयपीएलमध्ये 108 मॅचमध्ये 2197 धावा ठोकल्या आहेत. आयपीएलच्या 14 व्या पर्वामध्ये सूर्यकुमार यादवने सात मॅचमध्ये 173 रन केले आहेत. कोरोना व्हायरसच्या मैदानातील एन्ट्रीमुळे आयपीएलचं 14 पर्व अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलं आहे.
(Suryaumar yadav on MS Dhoni Virat kohli Rohit Sharma)
हे ही वाचा :
Sushil Kumar | फरार पैलवान सुशील कुमारला अखेर अटक, 18 दिवसांचा शोध संपला
जेव्हा धनश्री आणि युजवेंद्रमध्ये विराट कोहली आला, काय आहे फोटोमागची कहाणी?