100 ग्रॅम अतिरिक्त वजन विनेशने केलेल्या कामगिरीवर भारी पडलं. 50 किलो वजनी गटातून खेळत असताना कुस्तीपटू विनेश फोगाटला स्पर्धेतून बाहेर केलं गेलं. त्याला कारण ठरलं ते 100 ग्रॅम अतिरिक्त वजन… विनेशचं वजन 50 किलोच्या आत असणं अपेक्षित होतं. पण 50 किलो 100 ग्रॅम विनेशचं वजन भरलं. त्यामुळे फायनल खेळण्याआधीच विनेश स्पर्धेतून बाहेर झाली. यावर वेगवेगळ्या स्तरातून देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. नेमबाजीत कांस्यपदक मिळवणारा नेमबाज स्वप्नील कुसाळे याने विनेशच्या अपात्रतेवर प्रतिक्रिया दिली आहे. विनेश फोगाट सध्या काय परिस्थितीतून जात असेल, हा एक खेळाडूच समजू शकतो. खेळाडू म्हणून विनेश फोगटसाठी वाईट वाटत आहे, असं स्वप्नील म्हणाला.
महाराष्ट्राच्या मातीत चांगले खेळाडू घडतात. हे मेडल एकट्या माझं नाही तर देशाचे आहे. खेळात प्रेशर हॅण्डल करणं महत्वाचे असतं ते मी केलं. देशासाठी गोल्ड मेडल मिळवण्यासाठी अजून खेळायचं आहे आणि देशासाठी गोल्ड मेडल मिळवून द्यायचं आहे. क्रीडाप्रबोधिनी नाशिकमधून माझी शूटिंगची सुरुवात झाली. मी स्वतः च स्वतः चा हिरो आहे, असं स्वप्निल कुसाळे म्हणाला.
कोल्हापूरला जाण्याची उत्सुकता आहे. अनेक दिवस झालं घरी गेलो नाही. पण परत सुरुवात करावी लागणार आहे. मला गोड खायला आवडतं. मी कितीतरी दिवस झालं दूध घेतलं नाही. ज्यामुळे त्रास होतो. खाण्या पिण्यावर बंधने आली. गेल्या वेळी स्पर्धेत त्रास झाला होता. कोल्हापूरला जाऊन देवीचं दर्शन घेणार आहे. मी स्वतः शरीरावर लक्ष ठेवून होतो. कारण शरीर जर साथ देत असेल तर सगळं चांगलं होतं. माझ्या ड्रीमसाठी खेळत आहे. मी.कमी पडलो आहे गोल्ड मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असं स्वप्निलने सांगितलं आहे.
माझी स्वप्न इथंच संपलं नाही. मला देशासाठी गोल्ड आणायचं आहे. आता मला आनंद आहे की देशासाठी पदक जिंकू शकलो पण गोल्ड मेडल जिंकायचं आहे. मी त्यासाठी प्रयत्न करत राहणार आहे. आज मायदेशी परतलो आनंद वाटला सगळ्यांनी खूप सपोर्ट केला आहे. सगळ्यांचे आभार… यापुढेही देशासाठी खेळत राहणार आहे, असं स्वप्नील कुसाळे म्हणाला.