मुंबई : मुंबई प्रीमिअर लीग T20 क्रिकेट मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या कोव्हिड प्रादुर्भावामुळे एमपीएलचा तिसरा सिझन पुढे ढकलल्याची माहिती मुंबई प्रीमिअर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी दिली. नार्वेकरांची चेअरमनपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच या मालिकेच्या आयोजनाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. (T20 Mumbai Premier League Postpone Mumbai Cricket Association MCA MPL Chairman Milind Narvekar announces)
सध्या कोव्हिड प्रादुर्भावामुळे यंत्रणांवर असलेला ताण लक्षात घेत मालिकेचा तिसरा सिझन तूर्त न आयोजित करण्याचा निर्णय मिलिंद नार्वेकर आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (Mumbai Cricket Association – MCA) अध्यक्ष विजय पाटील यांनी संयुक्तपणे घेतला आहे. मिलिंद नार्वेकर यांनी ट्विटरवरुन यांसंबंधी माहिती दिली. प्रत्येकाची सुरक्षितता लक्षात घेत पुढील आदेशापर्यंत मुंबई प्रीमिअर लीग T20 मालिका भरवणार नसल्याचं पत्रक जारी करण्यात आलं आहे.
Given the current situation, President Vijay Patil Ji and I, in my capacity as the Chairman, have decided to not conduct the T20 Mumbai League till further notice.
This is our way to reduce the load on the machinery and also making sure everyone is safe. pic.twitter.com/2nHmHuNnbu
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) April 29, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी क्रिकेटच्या क्षेत्रातही आपली इनिंग सुरु केली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मुंबई प्रीमिअर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदाची सूत्रे नार्वेकरांनी डिसेंबर 2020 मध्ये हाती घेतली होती. चेअरमनपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच या मालिकेच्या आयोजनाची जबाबदारी मिलिंद नार्वेकर यांच्याकडे होती.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधरण सभेत (AGM) मिलिंद नार्वेकर आणि सुरेश सामंत यांची MPL च्या गव्हर्निंग कौन्सिलच्या चेअरमपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी नार्वेकरांकडून मुंबईकरांना नववर्षाच्या शुभेच्छा देणारी पोस्टर्स मुंबईत झळकली होती. (T20 Mumbai Premier League Postpone Mumbai Cricket Association MCA MPL Chairman Milind Narvekar announces)
मिलिंद नार्वेकरांचा अल्पपरिचय
मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आहेत. गटप्रमुख ते उद्धव ठाकरेंचे सचिव ते आता शिवसेना सचिव असा मिलिंद नार्वेकरांचा राजकीय प्रवास राहिला आहे.
मिलिंद नार्वेकर काही वर्षांपूर्वी मातोश्रीवर शाखाप्रमुख पदाच्या मुलाखतीसाठी गेले होते. त्यावेळेस उद्धव ठाकरे यांची नजर मिलिंद नार्वेकरांवर गेली. मिलिंद नार्वेकर यांच्यातील हुशारी, संवाद कौशल्य या गुणांमुळे मिलिंद नार्वेकरांची उद्धव ठाकरेंच्या पीए म्हणून निवड झाली. तेव्हापासून ते आजतायागत नार्वेकर हे अनेक जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडत आहेत.
संबंधित बातम्या :
MPL च्या गव्हर्निंग कौन्सिलच्या चेअरमनपदी मिलिंद नार्वेकर बिनविरोध
MPL ची सूत्रं स्वीकारताच मिलिंद नार्वेकरांची बॅटिंग, ठाकरे-पवारांच्या फोटोसह होर्डिंगबाजी
(T20 Mumbai Premier League Postpone Mumbai Cricket Association MCA MPL Chairman Milind Narvekar announces)