सिडनी : पाकिस्तान टीम (Pakistan) सेमीफायनलमध्ये (Semifinale) पोहोचल्यापासून त्यांच्या दिग्गज माजी खेळाडूंनी कर्णधार बाबर आझमला (babar azam) सल्ला देण्यास सुरुवात केली आहे. कारण पाकिस्तानच्या टीमचा विश्वचषक स्पर्धेतील आतापर्यंतचा प्रवास खडतर राहिला आहे. न्यूझिलंडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान कशी कामगिरी करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. उद्या न्यूझिलंडची मॅच पाकिस्तानविरुद्ध सिडनीच्या मैदानात होणार आहे.
दोन्ही टीम सिडनीत दाखल झाल्या आहेत. तसेच दोन्ही टीमनी कसून सराव सुरु केला आहे. न्यूझिलंड टीम पाकिस्तान टीमपेक्षा तगडी असल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. भारतीय वेळेनुसार पाकिस्तान आणि न्यूझिलंड यांची मॅच उद्या दीड वाजता सुरु होईल.
ऑस्ट्रेलियात सध्या पाऊस सुरु आहे. पावसाचा फटका अनेक मोठ्या टीमला बसला आहे. समीफायनलमध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, इंग्लंड, न्यूझिलंड या चार टीम पोहोचल्या आहेत. 10 नोव्हेंबरला टीम इंडियाची न्यूझिलंडसोबत मॅच होणार आहे.
Adelaide ✈️ Sydney #WeHaveWeWill | #T20WorldCup pic.twitter.com/uyncm4WPjJ
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 7, 2022
न्यूझीलंड टीम
केन विल्यमसन (कर्णधार), टिम साऊदी, ईश सोधी, मिचेल सँटनर, ग्लेन फिलिप्स, जिमी नीशम, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, मार्टिन गुप्टिल, लॉकी फर्ग्युसन, डेव्हन कॉनवे, मार्क चॅपमन, मायकेल ब्रेसवेल, ट्रेंट बोल्ट, फिन एलेन .
पाकिस्तान टीम
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद , फखर जमान.