T20 WC 2022: बाबर आझमच्या ड्रेसिंग रूमच्या व्हिडिओवर वसीम अक्रम संतापला, म्हणाला “हे योग्य नाही…”

| Updated on: Nov 07, 2022 | 8:04 PM

हा व्हिडीओ सार्वजनिक अत्यंत चुकीचं असल्याचं वसीम अक्रम याने म्हटलं आहे.

T20 WC 2022: बाबर आझमच्या ड्रेसिंग रूमच्या व्हिडिओवर वसीम अक्रम संतापला, म्हणाला हे योग्य नाही...
Wasim-Akram
Follow us on

मेलबर्न : विश्वचषक स्पर्धेतील (T20 World Cup 2022) मॅचेस आता सेमीफायनलपर्यंत आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक टीमने पुढच्या टीमसोबत मैदानात कशी खेळी करायची याची तयारी सुरु केली आहे. पाकिस्तान, इंग्लंड, न्यूझिलंड, इंडिया या टीम सेमीफायनलमध्ये पोहोचल्या आहेत. टीम इंडियाची (Team India) 10 तारखेला इंग्लंडविरुद्ध (England) मॅच होणार आहे. तर न्यूझिलंडची (NZ) टीम पाकिस्तान टीमसोबत मॅच खेळणार आहे.

पाकिस्तान टीम सेमीफायनलमध्ये पोहोचल्यानंतर कर्णधार बाबर आझम टीममधील खेळाडूंना काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डकडून व्हायरल करण्यात आला आहे. त्या व्हिडीओमुळे वसीम अक्रम अधिक संतापला आहे.

हे सुद्धा वाचा

हा व्हिडीओ सार्वजनिक अत्यंत चुकीचं असल्याचं वसीम अक्रम याने म्हटलं आहे. तसेच मी समजा पाकिस्तान टीमचा कर्णधार असतो, तर असा व्हिडीओ तयार झाला नसता. विशेष म्हणजे अशा गोष्टीची गोपणीयता बाळगायला हवी. अशा पद्धतीने व्हिडीओ शेअर करणे सगळ्यात अवघड आहे. आतापर्यंत अशा पद्धतीने कोणत्याही टीमने व्हिडीओ तयार केलेला नाही.