ऑस्ट्रेलियात (Australia) रविवारपासून क्रिकेटचा महासंग्राम (T20 World Cup 2022) सुरु झाल्यापासून चाहते प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत. येत्या रविवारी टीम इंडियाचा (Team India) आणि पाकिस्तानची मॅच मेलबर्नच्या मैदानात होणार आहे. त्यामुळे जगभरातील क्रिकेटचे चाहते त्या मॅचची वाट पाहत आहेत. कारण आत्तापासून चाहत्यांनी सोशल मीडियावर तर्क लावायला सुरुवात केली आहे.
नुकताचं आयसीसीने इंन्स्टाग्रामच्या अकाऊंटवरती एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये विराट कोहली नसल्याने चाहते खवळले असल्याचे स्पष्ट दिसत आहे. कारण चाहत्यांनी कमेंट करून टीम इंडियाचा किंग कुठे आहे असं विचारलं आहे.
आयसीसीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये टीम इंडियामधील रोहित शर्मा, केएलराहूल, सूर्यकुमार यादव आणि युजवेंद्र चहल इत्यादी खेळाडू दिसत आहेत. सोशल मीडियावर रविवारी होणाऱ्या मॅचची सुध्दा अधिक चर्चा सुरु आहे. मॅचेसच्या सगळ्या तिकीट विक्री झाल्या आहेत.