मुंबई : आयसीसी वुमन्स टी 20 वर्ल्डकपच्या तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने भारतासमोर 152 धावांचं आव्हान ठेवलं आहे. हा सामना उपांत्य फेरीसाठी महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकल्यानंतर भारत थेट उपांत्य फेरीत धडक मारणार आहे. 20 षटकात 7 गडी गमवून इंग्लंडने 151 धावा केल्या आणि विजयासाठी 152 धावांचं टार्गेट दिलं आहे.इंग्लंडच्या 7 गडी बाद करण्यात रेणुका सिंग ठाकुरचा मोठा वाटा आहेत. कारण तिने तिच्या 4 षटकात 15 धावा देत निम्मा इंग्लंड संघ तंबूत पाठवला. रेणुका सिंगने 4 षटकात 15 धावा देत पाच गडी बाद केले.सोफियचा डंकले, डॅनी व्यॅट, एलिस कॅपसे, एमी जोन्स, कॅथरिन क्विवर ब्रंट आणि हिथर नाइट यांना बाद केलं. भारतीय संघात एकच बदल करण्यात आला आहे. देविका वैद्यच्या जागी शिखा पांडेला प्लेईंग 11 मध्ये स्थान देण्यात आलं आहे.हा दक्षिण आफ्रिकेतील सेंट जॉर्ज पार्क क्रिकेट मैदानात सुरु आहे.वर्ल्डकप इतिहासात इंग्लंड आणि भारत पाच वेळा आमनेसामने आले आहेत. मात्र पाचही सामने भारताने गमावले आहेत.
भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडकडून सोफिया डंकले आणि डॅनी व्यॅट ही जोडी सलामीला आली. मात्र रेणुका सिंगच्या पहिल्या षटकातल्या तिसऱ्या चेंडूवर डॅनीचा रिचा घोषनं झेल घेतला. तिला आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यानंतर तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रेणुका सिंहनं एलिस कॅप्सेलचा त्रिफळा उडवत तंबूचा रस्ता दाखवला. तिने 6 चेंडूत फक्त 3 धावा केल्या.त्यानंतर सोफिया डंकले 10 या धावसंख्येवर असताना रेणुका सिंगनं तिला बादल केलं. त्यानंतर नॅट आणि हिथर जोडीने चांगली भागीदारी केली. दोघांची अर्धशतकी भागीदारी शिखा पांडेनं फोडली. शफाली वर्मानं तिचा झेल घेत माघारी धाडलं.त्यानंतर नॅट स्क्विवरला 50 वर असताना दीप्ती शर्मानं बाद केलं. त्यानंतर एमी जोन्स आणि कॅथरिन स्क्विवर ब्रंट बाद करत रेणुकाने पाच गडी टीपले.
इंग्लंडचा संघ : सोफिया डंकले, डॅनी व्यॅट, एलिस कॅपसे, नॅट क्विवर ब्रंट, हिथर नाइट, एमी जोन्स, कॅथरिन क्विवर ब्रंट, सोफी एस्सेलस्टोन, चार्ली डीन, सारा ग्लेन, लॉरेन बेल
भारतीय संघ : शफाली वर्मा, स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिक्स, हरमनप्रीत कौर, रिचा घोष,दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, शिखा पांडे, राजेश्वरी गायकडवाड, रेणुका सिंग