Team India Schedule T20 World Cup 2024 : कधी- कुठे आणि कोणाशी होणार लढत ? टीम इंडियाचं पूर्ण शेड्यूल जाणून घ्या

| Updated on: Jun 01, 2024 | 9:27 AM

यावर्षी टी20 वर्ल्डकपचा फॉरमॅट थोडा वेगळा आहे आणि 20 टीम्स या 5-5 अशा चार ग्रुप्समध्ये विभागण्यात आल्या आहेत. टीम इंडिया ग्रुप-A मध्ये आहे, तेथे पाकिस्तान, कॅनडा, आयर्लंड आणि को-होस्ट अमेरिका देखील आहे. सर्वात खास गोष्ट म्हणजे सुपर-8 मध्ये भारतीय संघ कोणत्या ग्रुपमध्ये असेल हे आधीपासूनच ठरवण्यात आले आहे. सेमीफायनलमध्ये धडक मारली तर भारतीय संघ कुठे सामना खेळेल हेही आधीच निश्चित करण्यात आले आहे.

Team India Schedule T20 World Cup 2024 : कधी- कुठे आणि कोणाशी होणार लढत ? टीम इंडियाचं पूर्ण शेड्यूल जाणून घ्या
Follow us on

जून महिन्याला आज सुरूवात झाली असून या संपूर्ण महिन्यात क्रिकेट चाहत्यांच्या ओठावर ‘T20 वर्ल्ड कप’ हे एकच नाव दुमदुमणार आहे. उद्या, अर्थात रविवार, 2 जूनपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून अमेरिकेच्या भूमीवर पहिल्यांदाच विश्वचषक खेळवला जाणार आहे. दर वर्ल्डकप प्रमाणेच यावेळीही टीम इंडिया विजयाची मोठी दावेदार मानली जात आहे. त्याप्रमाणेच या स्पर्धेत अनेकांचे लक्ष हे भारत वि. पाकिस्तान सामन्यावरही लागले आहे. हा सामना न्यूयॉर्कमध्ये खेळवण्यात येणार आहे, तेथे आधीच भारतीय आणि पाकिस्तानी वंशाचे अनेक लोक राहतात.
ही स्पर्धा यंदा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार असल्याने प्रक्षेपणाच्या वेळेत बराच फरक होऊ शकतो. त्यामुळे भारतीय संघ कोणत्या दिवशी, कोणत्या वेळी, कोणत्या संघाशी सामना खेळणार आहे, याची संपूर्ण माहिती एका क्लिकवर तुम्हाला मिळेल.

हे नक्की वाचा

टीम इंडियाचं शेड्युल जाणून घेण्यापूर्वी काही गोष्टी समजून घेणेही महत्वाचे आहे. यावेळी सुरुवात ग्रुप स्टेजपासून होईल ज्यामध्ये टीम इंडिया ग्रुप-ए मध्ये आहे. यानंतर, चारही गटातील प्रत्येकी 2 संघ सुपर-8 फेरीत जातील. तेथून पुढे सेमीफायनल आणि फायनल मॅच होईल. सगळ्यात महत्वाची होष्ट म्हणजे यावेळच्या वर्ल्डकपसाठी आयसीसीतर्फे ‘सीडिंग’ आधीच केले आहे. म्हणजेच, ग्रुप स्टेजमध्ये कोणी प्रथम किंवा द्वितीय क्रमांकावर असला तरीही, कोणाला पहिला संघ मानला जाईल आणि गटातील दुसरा संघ कोण असेल हे आधीच निश्चित केले जाते. या आधारे सुपर-8 चे गट ठरवले जातील.

हे नक्की कसं असेल ते सजून घेऊया. टीम इंडिया आणि पाकिस्तान ग्रुप-A मध्ये आहेत. आयसीसीतर्फे भारतीय संघाला A-1 सीड मिळाले आहे तर पाकिस्तानला A-2. जर गट फेरीत पाकिस्तानला सर्वाधिक गुणांसह पहिले स्थान मिळाले आणि टीम इंडियाला दुसरे स्थान मिळाले तरही सुपर-8 फेरीत टीम इंडियाला A-1 आणि पाकिस्तानला A-2 असे मोजले जाईल. या आधारावर भारत सुपर-8 च्या ग्रुप-1 मध्ये असेल आणि पाकिस्तान ग्रुप-2 मध्ये असेल. त्याचप्रमाणे, बी,सी आणि डी या गटातील संघांचे सीडिंग आधीच ठरलेले आहे आणि त्याच आधारावर ते सुपर-8 गटात स्थान मिळवतील.

सेमीफायनल पहिल्यापासूनच निश्चित

भारतीय संघ या वर्ल्डकपमध्ये कसा परफॉर्म करतो, त्यावर तो सेमीफायनलमध्ये खेळेल की नाही हे निश्चित होईल. टीम इंडिया ही सेमीफायनलसाठी क्वॉलिफाय झाली तर ती पहिला सेमीफायनल खेळेल की दुसरा हे आधीपासूनच निश्चित करण्यात आले आहे. टीम इंडिया सेमीफायनलपर्यंत पोहोचली तर ते दुसरी सेमीफायनल खेळतील. सुपर-8मध्ये ते पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर असले तरी हाच क्रम राहील. 27 जून रोजी हा सामना गयाना येथे खेळण्यात येणार आहे.

टीम इंडियाचं शेड्यूल (सर्व मॅच रात्री 8 वाजता, भारतीय वेळेनुसार)

1 जून – भारत vs बांग्लादेश, नॅसो काउंटी स्टेडिअम, न्यूयॉर्क (वॉर्म-अप मॅच)

5 जून- भारत vs आयर्लंड, नॅसो काउंटी स्टेडिअम, न्यूयॉर्क

9 जून- भारत vs पाकिस्तान, नॅसो काउंटी स्टेडिअम, न्यूयॉर्क

12 जून- भारत vs अमेरिका, नॅसो काउंटी स्टेडिअम, न्यूयॉर्क

15 जून- भारत vs कॅनडा, फोर्ट लॉडरहिल, फ्लोरिडा

टीम इंडिया सुपर-8मध्ये क्वॉलिफाय केले तर त्यांचे शेड्युल पुढीलप्रमाणे असेल

20 जून- भारत vs C-1, ब्रिजटाउन, बार्बाडोस

22 जून- भारत vs D-2, नॉर्थ साउंड, अँटीगा

24 जून- भारत vs B-2, ग्रोस आयलेट, सेंट लूसिया

भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उप-कर्णधार), यशस्वी जायसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल.