ind vs aus : भारत आणि ऑस्ट्रेलिया मॅचवेळी शफाली वर्मा हिने दिली शिवी?, Video व्हायरल

| Updated on: Feb 23, 2023 | 10:04 PM

भारताची खेळाडू शफाली वर्माचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने शिवी दिल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

ind vs aus : भारत आणि ऑस्ट्रेलिया मॅचवेळी शफाली वर्मा हिने दिली शिवी?, Video व्हायरल
Follow us on

IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेमी फायनल सामना सुरू आहे. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. गोलंदाजांच्या ढिसार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाने 20 ओव्हरमध्ये टीम इंडियाला 173 धावांचं आव्हान दिलं होतं. या सामन्यातील भारताची खेळाडू शफाली वर्माचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने शिवी दिल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ बॅटींगला आल्यावर सावध पवित्रा घेतला होता. 173 धावा करताना सुरूवातीला भारतीय महिला गोलंदाजांना पिसणाऱ्या बेथ मुनीने अर्धशतक केलं. बेथ 32 धावांवर असताना तिचा झेल सुटला होता, या जीवदानानंतर बेथने आपला दांडपट्टा चालूच ठेवला. अर्धशतक झाल्यावर शिखा पांडेच्या गोलंदाजीवर 54 धावांवर असताना शफाली वर्माने झेल घेत तिच्या खेळीला ब्रेक लावला. झेल घेतल्यावर शफाली काहीतरी पुटपुटताना दिसली, नेटकऱ्यांनी यादरम्यानचा शफालीचा व्हिडीओ व्हायरल केला आहे.

 

भारताने हा सामना 5 धावांनी गमावला, ऑस्ट्रेलियाच्या 174 धावांचा पाठलाग करताना भारताला 167 धावांपर्यंत मजल मारता आली. हरमनप्रीतने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. मात्र धावबाद झाल्याने तिची ही खेळी व्यर्थ गेली कारण पुढे अंतराने विकेट्स पडत गेल्या आणि भारताच्या पराभवावर शिक्कामोर्तब झालं.

ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 173 धावांच्या पाठलाग करताना आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. शफाली वर्मा या सामन्यात अपयशी ठरली. 9 या धावसंख्येवर आता पायचीत होत तंबूत परतली. त्यानंतर स्मृती मंधाना देखील अवघ्या दोन धावा करून बाद झाली. त्यानंतर यास्तिका भाटिका धावचीत झाल्याने तिच्या रुपाने भारताला तिसरा धक्का बसला.

चौथ्या गड्यासाठी जेमिमा रॉड्रिक्स आणि हरमनप्रीत कौरनं डाव सावरला. या दोघांनी 69 धावांची भागीदारी केली. त्यानंतर जेमिमा रॉड्रिक्स चुकीचा फटका 43 या धावसंख्येवर परतली. त्यानंतर हरमनप्रीत कौरची खेळी सुरुच होती. पण धावचीत झाल्याने भारतीय क्रीडाप्रेमींच्या आशा मावळल्या. दीप्ती शर्मानं डाव सावरला खरा पण तिलाही स्नेह राण , राधा यादव यांची साथ मिळाली नाही. अखेर हा सामना भारताने 5 धावांनी गमावला.

दोन्ही संघांची प्लेईंग 11

Australia Playing 11 : मेग लॅनिंग (कर्णधार),बेथ मूने, अलिसा हीली (विकेटकीपर), अशले गार्डनर, इलिस पेरी, तहिला मॅग्राथ, ग्रेस हॅरिस, जॉर्जिया वारेहम, जेस जोनस्सेन, मेगन स्कूट आणि डार्सी ब्राउन.

Team India Playing 11 : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, यास्तिका भाटीया, स्नेह राणा, शिखा पांडे, राधा यादव आणि रेणूका सिंह.