सिडनी : आशिया चषकात सुर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) चांगली कामगिरी केल्यानंतर त्याच्या चाहत्यांची सोशल मीडियावर संख्या वाढली. त्यानंतर ऑस्ट्रेलिया (Australia) आणि आफ्रिका (SA) मालिकेत सुद्धा त्याचा फॉर्म त्याने कायम ठेवला. विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup 2022) सुरु झाल्यापासून सुर्यकुमार यादने चांगल्या गोलंदाजांची धुलाई केली आहे. जगभरातल्या क्रिकेटच्या चाहत्यांनी सुर्यकुमार यादवचं कौतुक केलं आहे. काल झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या मॅचमध्ये अर्धशतकी पारी खेळल्यानंतर सुर्यकुमारने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
.@imVkohli approves ? ?#TeamIndia | @surya_14kumar | #T20WorldCup | #INDvZIM pic.twitter.com/2aFdGaqct7
हे सुद्धा वाचा— BCCI (@BCCI) November 6, 2022
सुर्यकुमार यादव मागच्या काही दिवसांपासून चांगली कामगिरी केली आहे. त्याने कालच्या मॅचमध्ये 24 चेंडून 61 धावा केल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाने झिम्बाब्वेचा पराभव केला. सुर्यकुमारची बॅटिंग पाहून वसिम अक्रम सु्द्धा घाबरला आहे. तो म्हणतो गोलंदाजांने सुर्याला नेमका बॉल कुठे टाकावा असा प्रश्न पडतं असेल.
काल झिम्बाब्वेविरुद्ध टीम इंडियाने मॅच जिंकल्यानंतर सुर्यकुमार यादवने काही फोटो आणि आशय सोशल मीडियावर लिहीला आहे. त्यामध्ये निळ्या रंगात रंग असण्यासारखं दुसरं काही नाही असं लिहिलं आहे. त्यावर विराट कोहलीने “अलग लेवल” अशी कमेंट केली आहे. बीबीआयने त्याचा स्क्रीनशॉट शेअर करीत आम्हाला विराटचं म्हणणं मान्य आहे असं म्हटलं आहे.