नवी दिल्ली : टीम इंडियाला टी-20 वर्ल्ड कपपूर्वी तयारीसाठी एक चांगली संधी असणार आहे. कारण बीसीसीआयने (BCCI) बुधवारी टीम इंडियाच्या आगामी टी-20 मालिकेची माहिती दिलीय. त्यानुसार भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया (Australia)आणि साऊथ आफ्रिकेसोबत एकूण 6 सामन्यांची टी-20 मलिका होईल. त्यानंतर 3 एकदिवसीय सामनेही खेळले जातील. हे सामने 20 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान खेळले जातील. टी-20 विश्वचषक 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात होणार आहे. यात एकूण 16 देश सहभागी असतील.
बीसीसीआयने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरोधात 3 टी-20 सामने खेळावे लागणार आहेत. हे सामने 20, 23 आणि 25 सप्टेंबरला होतील. मालिकेतील पहिला सामना मोहालीमध्ये होणार आहे. त्यानंतर पुढील दोन सामने नागपूर आणि हैदराबादेत होणार आहेत. सध्या टी – 20 मध्ये ऑस्ट्रेलिया विश्वविजेता आहे. अशावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला नमवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल.
BCCI announces the schedule for the upcoming Australia and South Africa’s tour of India. India’s international home season 2022-23 will commence with a three-match T20I series against Australia in September & followed by a three-match T20I and ODI series against South Africa. pic.twitter.com/lXeyaklwxB
— ANI (@ANI) August 3, 2022
ऑस्ट्रेलियानंतर भारतीय संघ साऊथ आफ्रिकेशी दोन हात करेल. साऊथ आफ्रिकेविरोधात टी-20 सामने 28 सप्टेंबर, 2 आणि 4 ऑक्टोबरला होणार आहेत. हे सामने अनुक्रमे तिरुवअनंतपुरम, गुवाहाटी आणि इंदौरमध्ये खेळले जातील. टी-20 मालिकेनंतर दोन्ही देशात 3 एकदिवसीय सामनेही होणार आहेत. हे सामने 6, 9 आणि 11 ऑक्टोबरला होणार आहेत. लखनऊ, रांची आणि दिल्लीमध्ये हे सामने होतील. टीम इंडियाला मागील वर्षी यूएईमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकात चांगलं प्रदर्शन करता आलं नव्हतं. त्यामुळेच या वर्षीच्या टी-20 विश्वचषकापूर्वी बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघांविरोधात टी-20 मालिका ठेवल्याचं बोललं जात आहे.