वनडेसाठी टीम इंडियामध्ये (Team India) संधी न मिळाल्याने पृथ्वी शॉने (Prithvi shaw) नाराजी व्यक्त केली आहे. तसेच सोशल मीडियावर (Social Media) एक पोस्ट व्हायरल केली आहे. त्यामुळे त्याची सोशल मीडियावर अधिक चर्चा आहे. देशांर्गत क्रिकेट खेळत असताना त्याने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला संधी मिळण्याची शक्यता अधिक होती.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेसाठी जी टीम जाहीर केली आहे, त्यामध्ये अनुभवी खेळाडूंना अधिक संधी देण्यात आली आहे. शिखर धवनला (कर्णधार) तर श्रेयस अय्यर (उपकर्णधार) करण्यात आलं आहे.
संजू सैमसनला कॅप्टन करतील अशी शक्यता होती, परंतु निवड समितीने त्याला अधिक जवळ सुद्धा केले नाही. त्यामुळे त्याची सु्द्धा सोशल मीडियावर अधिक चर्चा आहे.
शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद सिराज, दीपक चहर.