नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्धच्या (West Indies) टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. 29 जुलैपासून सुरू होणाऱ्या या पाच सामन्यांच्या मालिकेत विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. 29 जुलैपासून सुरू होणाऱ्या या पाच सामन्यांच्या मालिकेत विराट कोहलीला (Virat Kohli) विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते. आता तो टी-20 किंवा वनडे मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडिजला जाणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. तर के. एल. राहुल आणि कुलदीप यादव यांचे संघात राहणे त्यांच्या फिटनेसवर अवलंबून असणार आहे. कोहलीशिवाय नंबर-1 वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहलाही (Jasprit Bumrah) टी-20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल वनडेत बुमराहने 19 धावांत 6 विकेट घेतल्या होत्या. तसेच, शस्त्रक्रियेनंतर केएल राहुलचेही संघात पुनरागमन झाले आहे.
लेगस्पिनर युजवेंद्र चहललाही या मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी रवी बिश्नोईला संधी देण्यात आली आहे. तर रविचंद्रन अश्विनचेही संघात पुनरागमन झाले आहे. याशिवाय फिरकीपटू अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांचीही संघात निवड करण्यात आली आहे. के. एल. राहुलचा समावेश त्याच्या फिटनेसवर अवलंबून असणार आहे. राहुल आणि कुलदीपला फिटनेस टेस्ट उत्तीर्ण करावी लागणार आहे.
रोहित शर्मा (कप्तान), ईशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.
Rohit Sharma (C), I Kishan, KL Rahul*, Suryakumar Yadav, D Hooda, S Iyer, D Karthik, R Pant, H Pandya, R Jadeja, Axar Patel, R Ashwin, R Bishnoi, Kuldeep Yadav*, B Kumar, Avesh Khan, Harshal Patel, Arshdeep Singh.
*Inclusion of KL Rahul & Kuldeep Yadav is subject to fitness.
— BCCI (@BCCI) July 14, 2022