मुंबई : जून महिन्यात टीम इंडिया (Team India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021 चा अंतिम सामना (ICC World Test Championship Final) खेळवण्यात येणार आहे. या अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंड विरुद्धच्या 5 कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने (BCCI) ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने खेळाडूंची निवड केली आहे. या अंतिम सामन्यासाठी या नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. हा अंतिम सामना 18 ते 23 जून दरम्यान साऊथम्पटनमध्ये खेळवण्यात येणार आहे. (Team India announces squad for ICC World Test Championship 2021 final and test series against England)
The All-India Senior Selection Committee has picked the Indian squad for the inaugural ICC World Test Championship (WTC) final and the five-match Test series against England. #TeamIndia pic.twitter.com/emyM8fsibi
— BCCI (@BCCI) May 7, 2021
निवड समितीने पुन्हा एकदा युवा पृथ्वी शॉवर अविश्वास दाखवला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पृथ्वीला संधी मिळाली नाही. पृथ्वीने विजय हजारे करंडकात आणि आयपीएलच्या 14 व्या मोसमात शानदार कामगिरी केली. पृथ्वीने आपल्या नेतृत्वात विजय हजारे स्पर्धेत संघाला जेतेपद जिंकून दिलं होतं. तर आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 8 सामन्यात 308 धावा केल्या होत्या. त्यामुळे पृथ्वीचं कसोटी संघात कमबॅक होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र अखेरीस पृथ्वीच्या पदरी निराशा पडली आहे.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड, 18 ते 23 जून, साउथ्मपटन
पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट
दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट
तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट
चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर
पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.
अशी आहे टीम इंडिया :
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव,
संबंधित बातम्या :
(Team India announces squad for ICC World Test Championship 2021 final and test series against England)