मुंबई : विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) खेळाडूंनी खराब कामगिरी केल्यापासून निवड समितीसह खेळाडूंवर टीका झाली होती. बीसीसीआयकडे (BCCI) अनेकांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. विशेष म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून टीम इंडियाच्या (Team India) चाहत्यांनी खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना तात्काळ हटवण्याची मागणी केली होती. काल बीसीसीआयने निवड समिती बरखास्त केली, तसेच बीसीसीआय अजून मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुत्रांनी मीडियाला दिली आहे.
काल चेतन शर्मा यांची निवड समिती बरखास्त केल्यापासून निवड समितीच्या चीफ या पदासाठी अजित आगरकरचं नाव अधिक चर्चेत असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. याच्या आगोदर सुद्धा अजित आगरकरने अर्ज केला होता. परंतु मागच्यावेळी त्यांना निवड समितीचं पद मिळालं नाही. यावेळी अजित आगरकर यांना पद मिळण्याची अधिक शक्यता आहे.
अजित आगरकर एक युवा खेळाडू आहे. त्यांच्याकडे तिन्ही फॉरमॅटमधील अनुभव आहे. मागच्यावेळी त्याचं नाव अगदी जवळपास आलं होतं. यावर्षी अजित आगरकरचं नाव जवळपास फायनल झालं आहे. अजून आगरकरशी कोणचं बोलणं झालेलं नाही. परंतु आगरकरचा होणार आल्यास त्याचं नाव निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे.
चीफ सेलेक्टर होण्यासाठी या गोष्टी आवश्यक
टीम इंडियाचा कोणताही खेळाडू ज्याने सात कसोटी सामने खेळले आहेत
30 चांगल्या मॅच खेळल्या आहेत
10 एकदिवसीय सामने खेळले आहेत
पाच वर्षापुर्वी तो क्रिकेटर निवृत्त झालेला असावा
बीसीसीच्या कोणत्याही कमेटीचा सदस्य नसावा, तसेच पाच वर्षे सेवा करण्याची तयारी असावी
अजित आगरकर यांची कारकीर्द
26 कसोटी, 58 विकेट्स
191 वनडे, 288 विकेट्स
4 T20, 3 विकेट्स
32 आयपीएल सामने, 29 विकेट