मुंबई : बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील शेवटचा सामना उरला आहे. या मालिकेत भारताने 2, ऑस्ट्रेलियाने 1 सामना जिंकला आहे. त्यामुळे मालिकेत 2-1 अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे तिन्ही सामने तिसऱ्याच दिवशी संपले. त्यामुळे आयसीसीपासून काही आजी माजी खेळाडूंनी खेळपट्ट्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. इंदुरच्या सामन्यानंतर आयसीसीने स्वत:च लक्ष घातलं आहे. टीम इंडियाने पहिले दोन सामने जिंकल्यानंतर तिसरा सामना गमावल्यानंतर माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंटवर निशाणा साधला आहे. गावसकर यांच्या मते, वेगवान गोलंदाजी तितकी चांगली नसल्याने फिरकीपटूंसाठी खेळपट्ट्या तयार केल्या जात आहेत.
“भारतात 20 गडी बाद करणं सोपं नाही. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि कमी अनुभव असलेल्या मोहम्मद सिराजला बाजूला केलं तर भारतात वेगवान गोलंदाजी तितकी चांगली नाही. पण सुक्या खेळपट्ट्यांवर भारत 20 गडी बाद करू शकतो. म्हणून मला वाटतं अशा खेळपट्ट्या तयार केल्या जात आहेत. “, असं सुनिल गावसकर यांनी एका न्यूज चॅनेलशी बोलताना सांगितलं.
“वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी यापेक्षा दुसरा पर्याय नाही. जर तुमच्याकडे चांगला बॉलिंग अटॅक असता तर वेगळं काही करण्याची गरज नसती. पण फिरकीपटू ही ताकद आहे त्यामुळेच अशा खेळपट्ट्या तयार केल्या आहेत. पाटा खेळपट्ट्या तयार करून तुम्ही फलंदाजांना पुरक खेळपट्ट्या तयार करू शकत नाहीत. या खेळपट्ट्या फलंदाजांची परीक्षा घेतात.”, असं सुनिल गावसकर यांनी पुढे सांगितलं. गेल्या सप्टेंबरपासून जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघात नाही. आयपीएल 2023 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही खेळणं कठीण आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी भारताला चौथा सामना काहीही करून जिंकणं गरजेचं आहे. भारताने चौथा सामना गमावला तर मात्र अंतिम फेरीचं गणित बिघडेल. भारताला श्रीलंका आणि न्यूझीलँड मालिकेवर अवलंबून राहावं लागणार आहे. दोन सामन्यांची ही मालिका आहे.
भारताचा चौथा कसोटी सामना आणि श्रीलंका-न्यूझीलँडचा पहिला सामना 9 मार्चपासून सुरु होत आहे. पुढचा सामना भारताने जिंकला तर प्रश्नच संपला. पण भारत पराभूत झाला तर मात्र न्यूझीलँडला श्रीलंकेला 1-0 वर रोखावं लागेल. म्हणजेच श्रीलंकेने एक सामना जिंकला आणि एक ड्रॉ झाला तरी भारत अंतिम फेरीत स्थान मिळवले