मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे चीप सिलेक्टर चेतन शर्मा यांच्या धक्कादायक खुलाशानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी भारतीय संघातील खेळाडूंवर गंभीर आरोप केले आहेत. काही खेळाडू फीट अँड फाईन राहण्यासाठी इंजेक्शन घेत असल्याचा आरोप केला आहे. चेतन शर्मा यांची नुकतीच चीफ सिलेक्टरपदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. एका खासगी चॅनेलच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हा धक्कादाखक खुलासा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे चेतन शर्मा यांनी जसप्रीत बुमहाहची दुखापत आणि खेळाडूंना संघाबाहेर राहणं भीतीदायक वाटत असल्याचं देखील सांगितलं आहे.
भारतीय संघातील खेळाडू गेल्या काही दिवसांपासून फिटनेसमुळे आत बाहेर होत आहेत. खासकरून गेल्या वर्षी संघातील वरिष्ठ खेळाडू दुखापतीमुळे खेळू शकले नव्हते. तर काही खेळाडूंनी संघात पुनरागमन करून दुखापतग्रस्त असल्याचं पाहीलं गेलं आहे. त्यामुळे खेळाडूंचा फिटनेस वारंवार खराब का होत आहे? असा प्रश्न पडतो. मात्र चेतन शर्मा यांच्या स्टिंग ऑपरेशननंतर धक्कादायक माहिती समोर आला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाद्वारे 7 जानेवारी 2023 नव्या निवड समितीची घोषणा करण्यात आली.या समितीत पुन्हा एका माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा यांची चीफ सिलेक्टर म्हणून निवड करण्यात आली आहे. चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली मागील सिलेक्शन समितीला दोनदा टी 20 वर्ल्डकप पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर बीसीसीआयने नवी सिलेक्शन समितीची बनवण्याची घोषणा केली होती. मात्र पुन्हा त्यांची नियुक्ती करण्यात आली.