मुंबई : भारतीय क्रिकेट संघ (Team India) आज ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) दाखल झाला आहे. 25 सदस्यीय टीम इंडिया कप्तान विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात सिडनी येथे पोहोचली आहे. भारतीय संघ या दौऱ्यामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळणार आहे. या तीनही मालिकांसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा यापू्र्वीच केली आहे. 27 नोव्हेंबरपासून सामन्यांना सुरुवात होणार असून त्याअगोदर भारतीय संघ 14 दिवस क्वारन्टाईन असेल. (Team India reaches at Sydney Australia, Virat kohli leaving in rugby legends Penthouse)
भारतीय संघासह ऑस्ट्रेलियाचे खेळाडू डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिंस, स्टिव्ह स्मिथदेखील गुरुवारी सिडनी येथे दाखल झाले. सर्व खेळाडूंना विनानतळावरुन सरळ सिडनी येथील ऑलिम्पिक पार्क येथे नेण्यात आले. टीम इंडिया ब्लॅकआऊट इंटरनॅशनल स्पोर्ट्स पार्कमध्ये सराव करणार आहे. यासाठी स्टेडियममध्ये पूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
क्वारन्टाईन काळात कर्णधार विराट कोहलीसह सर्व भारतीय खेळाडूंना विशेष सुविधा पुरवल्या जाणार आहेत. ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र डेली टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय संघ 14 दिवस पुलमॅन हॉटेलमध्ये राहणार आहे. न्यू साउथ वेल्स ब्ल्यूज नावाच्या रग्बी संघाचे खेळाडू नेहमी याच हॉटेलात वास्तव्य करतात. परंतु या संघाला सध्या दुसऱ्या हॉटेलात स्थलांतरित करण्यात आलं आहे.
विराट कोहलीला या ठिकाणी खास पेंटहाऊस देण्यात आले आहे. एरवी या पेंटहाऊसमध्ये रग्बी लिजंड ब्रॅड फिटलर राहतात. दरम्यान भारतीय खेळाडूंच्या कुटुंबातील सदस्यदेखील त्यांच्यासोबत या हॉटेलमध्ये राहू शकतात. त्यांनादेखील क्वारन्टाईन प्रोटोकॉल फॉलो करावा लागेल.
Dubai ✈️ Sydney
Hello Australia! #TeamIndia is here! ? pic.twitter.com/Rfu0wZlXW0
— BCCI (@BCCI) November 12, 2020
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक आणि संघाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहली टेस्ट, वनडे आणि टी 20 मध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नव्या चेहऱ्यांना संघात स्थान देण्यात आले आहे. यामध्ये नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, दीपक चाहर आणि टी. नटराजन या युवा खेळाडूंना टीम इंडियामध्ये स्थान देण्यात आले आहे.
आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करत असलेला लोकेश राहुलला वनडे आणि टी 20 सीरिजसाठी उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
एकदिवसीय संघ : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार&विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर
एकदिवसीय (वनडे) मालिका
पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी
दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी
तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल
टी-20 सीरिजसाठी टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), शिखर, मयांक अग्रवाल, केएल राहुल (उपकर्णधार&विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर आणि वरुण चक्रवर्ती
टी-20 मालिका
पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल
दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी
तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी
असा आहे कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराज
कसोटी (टेस्ट) मालिका
पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड
दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड
तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी
चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन
संबंधित बातम्या
India Tour Australia | ठरलं! अखेर हिटमॅन रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार, पण….
IND vs AUS : विराटच्या अनुपस्थितीत रहाणेऐवजी रोहितला कर्णधार करा; इरफान पठाणचा सल्ला
India Tour of Australia | कसोटी मालिकेदरम्यान या कारणामुळे कर्णधार कोहली मायदेशी परतणार
India Tour Australia | टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलिया नव्या जर्सीसह मैदानात
(Team India reaches at Sydney Australia, Virat kohli leaving in rugby legends Penthouse)