ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची लवकरच घोषणा, पाचवा जलदगती गोलंदाज ठरतोय डोकेदुखी

| Updated on: Oct 20, 2020 | 4:03 PM

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होणार आहे. परंतु कसोटी मालिकेत भारताचा पाचवा जलदगती गोलंदाज कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची लवकरच घोषणा, पाचवा जलदगती गोलंदाज ठरतोय डोकेदुखी
Follow us on

मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होणार आहे. परंतु कसोटी मालिकेत भारताचा पाचवा जलदगती गोलंदाज कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये म्हणजेच कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळणार आहे. (Team India to be announced soon for Australia tour, to choose fifth fast bowler is the main Challenge for slection committee)

मिळालेल्या माहितीनुसार या मालिकांसाठी सिलेक्शन कमिटीचे चेअरमन सुनील जोशी यांच्या अध्यक्षतेखाली या आठवड्यात बैठक होईल. या बैठकीत संघातील खेळाडूंची निवड होईल. पाचवा जलदगती गोलंदाज निवडणे हे या कमिटीसमोरचे मुख्य आव्हान असेल.

टीम इंडियाचे दोन प्रमुख जलदगती गोलंदाज जखमी झाल्यामुळे कसोटी मालिकेतील पाचव्या गोलंदाजाचा मुद्दा जास्त महत्त्वाचा बनला आहे. भुवनेश्वर कुमार आणि इशांत शर्मा हे दोघेही सुरु असलेल्या आयपीएलदरम्यान जखमी झाले आहेत. भुवीला हॅमस्ट्रिंग इंज्युरी झाली आहे तर इशांतला स्टाईड स्ट्रेन.

सध्याच्या परिस्थितीत भारताकडे मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव हे तीन मुख्य पेसर्स (जलदगती गोलंदाज) आहेत. नवदीप सैनी भारताचा चौथा जलदगती गोलंदाज असेल. पाचव्या गोलंदाजाची निवड करणे समितीसाठी अवघड जाणार आहे.

पाचव्या जलदगती गोलंदाजाची जागा मिळवण्यासाठी हैदराबादचा मोहम्मद सिराज आणि मुंबईचा शार्दुल ठाकूर हे दोघे रेसमध्ये आहेत. सिराजने इंडिया ए आणि रणजी ट्रॉफीच्या मोठ्या फॉरमॅटमधील सामन्यांमंध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. तर दुसऱ्या बाजूला शार्दुलकडे नवा चेंडू स्विंग करण्याची क्षमता आहे.

टीम इंडियाच्या सिलेक्शन कमिटीचे माजी चेअरमन याबाबत म्हणाले की, सिराजला पाचवा गोलंदाज म्हणून संघात स्थान देण्यात यावं. त्याने रणजी आणि इंडिया ए संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर तो यशस्वी ठरेल. तसेच ते म्हणाले की, शिवम मावी हादेखील एक चांगला पर्याय आहे. येणाऱ्या काळात तो क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगलं खेळू शकतो.

T20 मध्ये अक्षर पटेलला संधी?

ऑल्स्ट्रेलिया दौऱ्यासाठी फलंदाजांच्या यादीत काही नवे चेहरे दिसू शकतात. T20 सिरीजसाठी अक्षर पटेलला संधी दिली जाऊ शकते. IPL 2020 मध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. व्हाईट बॉल सिरीजमध्ये उमेश यादवचं प्रदर्शन फार बरं झालेलं नाही. त्यामुळे शार्दुल ठाकूर किंवा दीपक चाहरपैकी एकाची निवड होऊ शकते. T20 आणि एकदिवसीय मालिका नोव्हेंबरमध्ये होतील, तर कसोटी मालिका डिसेंबरमध्ये खेळवण्यात येईल.

संबंधित बातम्या

IPL 2020 | MIvKXIP : सचिन तेंडुलकरमुळे मुंबई सुपर ओव्हरमध्ये हरली?

Super Over | मुंबई-पंजाबची सुपर ओव्हरही टाय, सुपर ओव्हरबद्दल रंजक गोष्टी, 47 वेळा पाठलाग करणाऱ्यांचा विजय

IPL 2020, MI vs KXIP, Super Over : ‘डबल धमाल’, दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबचा मुंबईवर दणदणीत विजय

IPL 2020, SRH vs KKR : डेव्हिड वॉर्नरच्या आयपीएलमध्ये वेगवान 5 हजार धावा, विराट कोहलीला पछाडलं

IPL 2020 | ‘दुखापतग्रस्त’ दिल्लीला दिलासा, अमित मिश्राच्या जागी नव्या फिरकीपटूला संधी

(Team India to be announced soon for Australia tour, to choose fifth fast bowler is the main Challenge for slection committee)