मुंबई : विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा (Team India) लाजीरवाणा पराभव झाल्यापासून मोठा बदल होणार असल्याचं सुचक वक्तव्य बीसीसीआयने (BCCI) केलं होतं. त्याच अनुशंगाने बीसीसीआय सध्या निर्णय घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. न्यूझिलंड दौऱ्यासाठी टी-20 मालिकेचं कर्णधारपद हार्दीक पांड्याला (Hardik Pandhya) देण्यात आलं होतं. तर एकदिवसीय मालिकेसाठी शिखर धवनला टीमचं नेतृत्व करण्याची संधी देण्यात आली होती. वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देणार असल्याचं सुचक सुध्दा वक्तव्य बीसीसीआयने दिलं होतं.
श्रीलंकेतील एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडूंना डावलण्यात येणार असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. कारण काही दिवसात नव्या निवड समिती स्थापना होणार आहे. त्यांच्याकडून श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, मोहम्मद शमी, दिनेश कार्तिक आणि केएल राहुल या खेळाडूंना टी-20 मध्ये संधी मिळणार नसल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियामध्ये युवा खेळाडूंना संधी देण्यात येणार आहे. कारण टीम इंडियामध्ये सध्या अनेक वरिष्ठ खेळाडू आहेत. अनेक खेळाडूंना श्रीलंकेविरुद्ध संधी मिळणार नसल्याची माहिती बीसीसीआयच्या सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे हार्दीक पांड्याच्या नेतृत्वात टी-20 मालिकेसाठी युवा टीम श्रीलंकेला रवाना होण्याची शक्यता आहे.
कालच्या एकदिवसीय मालिकेत बांगलादेश टीमकडून टीम इंडियाचा पराभव झाल्याने चाहते निराश झाले आहेत.