मुंबई : टीम इंडियाचा माजी दिग्गज फलंदाज युवराज सिंग (Yuvraj Singh) यांची खेळी सगळ्यांना माहित आहे. त्याने त्याच्या कारर्कीदीमध्ये अनेक मॅच टीम इंडियाला (IND) एक हाती जिंकून दिल्या आहेत. त्याचबरोबर ज्यावेळी तो फलंदाजीसाठी येत होता, त्यावेळी अनेक दिग्गज गोलंदाजांना घाम फुटत होता. युवराज सिंगने सहा बॉलमध्ये सहा षटकार मारण्याचा रेकॉर्ड केला आहे. त्याचा तो व्हिडीओ अद्याप सोशल मीडियावर (Social media)फिरत आहे.
युवराज सिंगने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत चांगली खेळी केली होती. त्यावेळी तो चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्याने चांगल्या गोलंदाजांची धुलाई केली होती. युवराज सिंगची तुफान फलंदाजी पाहून अनेक माजी खेळाडूंनी टीम इंडिया विश्वचषक जिंकणार असल्याचं जाहीर केलं होतं. आज युवराज सिंगचा वाढदिवस आहे.
2000 साली एकोणीस वर्षीय विश्वचषक जिंकला, त्यावेळी युवराज सिंगने चांगली फलंदाजी केली होती. त्यानंतर युवराज सिंगला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळाली होती. टीम अडचणीत असताना युवराजने चांगली खेळी केली होती.
2007 मध्ये सुद्धा टी20 वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगचा पुन्हा चाहत्यांना जलवा पाहायला मिळाला होता. त्यावेळी युवराज सिंगने इंग्लंड टीमचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याला सहा बॉलमध्ये सहा षटकार लावले होते. त्यावेळी युवराजने 12 चेंडूत अर्धशतक मारले होते.
2011 झालेल्या वनडे वर्ल्ड कपमध्ये सुध्दा युवराज सिंगने टीम इंडियासाठी चांगलं योगदान दिलं होतं. त्यावेळी त्याने संपुर्ण विश्वचषक स्पर्धेत पंधरा विकेट घेतल्या होत्या, तर 362 धावा देखील केल्या होत्या. त्यामुळं युवराज सिंगला प्लेयर ऑफ द टूर्नामेंटचं अवॉर्ड सुद्धा देण्यात आला होता.