मुंबई : टीम इंडिया (IND) आणि न्यूझिलंड (NZ) यांच्यात उद्या एकदिवसीय सामना होणार आहे. उद्याची मालिका वाचवण्यासाठी टीम इंडियाला काहीही करुन मॅच जिंकावी लागणार आहे. पहिली मॅच न्यूझिलंड टीमने जिंकली, त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये पाऊस आला. त्यामुळे दुसरा सामना रद्द करावा लागला. उद्याच्या मॅचमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त करण्यात आली आहे. समजा उद्याच्या मॅचमध्ये (Match) पाऊस पडला तर, न्यूझिलंड मालिका जिंकेल.
क्राइस्टचर्चच्या हेगले ओवल मैदानात उद्याची मॅच होणार आहे. उद्या तिथल्या परिसरात हवामान खात्याने पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे टीम इंडिया मालिका गमावण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचे चाहते उद्याच्या मॅचची जोरदार चर्चा सोशल मीडियावर करीत आहेत.
पुढच्यावर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत संधी मिळवण्यासाठी किंवा आपली जागा निश्चित करण्यासाठी शिखर धवनला चांगली खेळी करावी लागणार आहे.
टीम इंडियामध्ये सध्या अनेक नवे चेहरे आहेत. त्यांच्याकडून टीम इंडियाची ओपनिंग केली जात आहे. प्रत्येकाला आपली जागा निश्चित करण्यासाठी चांगली खेळी करणं गरजेची आहे.
टीम इंडिया : शिखर धवन, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), दीपक हुडा, शाहबाज अहमद, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, दीपक सिंह चहल, अर्श चहल, दीपक सिंह आणि उमरान मलिक.
न्युझीलँड: केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, डेव्हिन कॉनवे, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, टिम साउथी, मॅट हेन्री, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, मिचेल सँटनर आणि लॉकी फर्ग्युन.