मेलबर्न : ऑस्ट्रेलियात (Australia) विश्वचषक स्पर्धेला (T20 World Cup 2022) सुरुवात झाल्यापासून अनेक क्रिकेटचे चाहते सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. क्रिकेटच्याबाबत एखादी घटना घडली, किंवा क्रिकेटची एखादी माहिती उघडकीस जरी आली, तरी त्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु होते. पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाचा (Team India) शेवटच्या ओव्हरपर्यंत संघर्ष पाहायला मिळाला. अखेरच्या चेंडूवर टीम इंडियाचा फिरकीपटू आर.आश्विनने विजयी चौकार लगावला.
नेदरलॅंडविरुद्ध सुद्धा काल झालेल्या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी उत्कृष्ट खेळी केली. रोहित शर्मा, विराट कोहली, सुर्यकुमार यादव या तीन फलंदाजांनी अर्धशतक झळकावलं. त्यामुळे कालच्या मॅचमध्ये टीम इंडियाला खूप मोठा विजय मिळला. टीम इंडियाची पुढची मॅच येत्या रविवारी होणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाची मॅच ऑस्ट्रेलियाच्या पर्थमध्ये होणार आहे. रविवारी सायंकाळी साडेचार वाजता मॅच सुरु होईल. डिजनी+हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्सवरती चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.
आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाने चांगली कामगिरी केली. त्यामुळे दोन्ही फॉरमॅटमधील मालिका टीम इंडियाने जिंकली. रविवारी होणाऱ्या मॅचमध्ये सुद्धा टीम इंडिया चांगली कामगिरी करेल अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.
टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विश्व के.), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
दक्षिण आफ्रिका टीम
टेंबा बावुमा, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, वेन पारनेल, लुंगी एनगिडी, अॅनरिक नॉर्सिया, मार्को जॅन्सेन, कागिसो रबाडा, रिले रोसो, तबरेझ शम्सी आणि ट्रिस्टन स्टब्स.