ऑस्ट्रेलियात (Australia) कालपासून विश्वचषक स्पर्धेच्या (T20 World Cup 2022) मॅचेस सुरु झाल्या आहेत. कालच्या मॅचमध्ये एक विशेष पाहायला मिळालं ते म्हणजे नामिबियाच्या टीममे तगड्या श्रीलंका टीमचा (Shri lanka) पराभव केला. त्यामुळे यापुढे होणाऱ्या सगळ्या मॅचेस एकदम रोमांचक होणार आहेत. आज टीम इंडियाची सराव मॅच ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका दौऱ्या जिंकल्यापासून टीम इंडियाच्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी मागचा सराव सामना खेळला नव्हता. परंतु आजच्या सामन्या दोघेही खेळण्याची शक्यता आहे. कारण पहिल्या सराव सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी विजय मिळविला होता. दुसऱ्या सराव सामन्यात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या टीमने टीम इंडियाचा पराभव केला होता.
दोन दिवसांनी टीम इंडियाची मॅच न्यूझिलंडच्या टीमशी होणार आहे.
ऑस्ट्रेलिया टीम
अॅरॉन फिंच (क), मॅथ्यू वेड (विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, टीम डेव्हिड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, अॅश्टन अगर, पॅट कमिन्स, केन रिचर्डसन, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड .
टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.