Sania Mirza Retire: नव्या वर्षात सानिया मिर्झाच्या चाहत्यांसाठी अत्यंत निराशाजनक बातमी आहे. टेनिसपटू (Tennis Player) सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत (Shoeb Malik) तलाकच्या बातम्या चर्चेत असतानाच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. सानिया मिर्झाने व्यावसायिक टेनिस करिअरमधून सन्यास घेण्याची घोषणा केली आहे. सानियाला झालेल्या इंज्युरीमुळे हा निर्णय घेतल्याचं तिने म्हटलंय.
तसंच पुढील महिन्यात दुबाईतला तिचा सामना करिअरमधला अखेरचा सामना असेल. दुबई टेनिस चँपियनशिपमध्ये तिचा खेळ चाहत्यांना पाहता येईल.
WTA वेबसाइटशी बोलताना भारतीय टेनिस स्टारने यासंबंधीची घोषणा केली. फेब्रुवारी महिन्यात दुबईत होणारा WTA1000 इव्हेंट ही तिच्या करिअरमधली शेवटची स्पर्धा असेल.
सानिया मिर्झा म्हणाले, मी प्रामाणिकपणे सांगते. माझ्या अटी-शर्थींवर जगायला मला आवडतं. मला झालेल्या जखमेमुळे टेनिसच्या बाहेर पडण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे मी प्रशिक्षण घेत होते…
टेनिसच्या डबल्समध्ये जगातील नंबर एकची खेळाडू राहिलेली सानिया मिर्झा 2022 या वर्षाच्या अखेरीस निवृत्ती घेणार होती. कोपऱ्याला झालेल्या जखमेमुळे तिला यूएस ओपन स्पर्धेत सहभाग घेता आला नव्हता.
डबल्समध्ये ६ वेळा ग्रँडस्लॅम विजेती ठेरलेली ही स्टार टेनिसपटू फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस ऑस्ट्रेलियन ओपन खेळेल. त्यानंतर दुबईत ती टेनिस कोर्टवर उतरेल.
मागील वर्षी सानियाचे वडील इमरान मिर्झा यांनी म्हटलं होतं की, विंबल्डन स्पर्धेनंतर ती निवृत्ती घेणार. या स्पर्धेत तिने मिक्स्ड डबल्सची सेमीफायनल गमावली होती. पण कोपऱ्याला जखम झाल्यामुळे तिने काही काळासाठी निवृत्तीची योजना पुढे ढकलली होती.
सानिया मिर्झाने पाच महिने डेटिंगनंतर पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत 2010 मध्ये लग्न केलं होतं. 30 ऑक्टोबर 2018 रोजी या जोडीला इजहान मिर्झा मलिक हा मुलगा झाला. आता पाकिस्तानी मीडियातून सानिया आणि शोएबच्या तलाकच्या बातम्या समोर येत आहेत.